औरंगाबाद, नवी मुंबई अपेक्षित निकाल, अनपेक्षित तथ्ये

(तुषार ओव्हाळ, झी २४ तास, मुंबई ) शिवसेनेने १९८४ नंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पक्षबांधणी करत असताना मराठवाड्यात नामांतरविरोध व मुस्लिमविरोध यांच्या आधारे पक्ष सर्वत्र पोचविला. मराठवाडयातील स्थानिक राजकारण, महाराष्ट्राचे स्थानिक राजकारण आणि स्थानिक संदर्भ: संपा: सुहास पळशीकर, नितीन बिरमल

Updated: Apr 26, 2015, 08:47 PM IST
औरंगाबाद, नवी मुंबई अपेक्षित निकाल, अनपेक्षित तथ्ये title=

मुंबई : (तुषार ओव्हाळ, झी २४ तास, मुंबई ) शिवसेनेने १९८४ नंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पक्षबांधणी करत असताना मराठवाड्यात नामांतरविरोध व मुस्लिमविरोध यांच्या आधारे पक्ष सर्वत्र पोचविला. मराठवाडयातील स्थानिक राजकारण, महाराष्ट्राचे स्थानिक राजकारण आणि स्थानिक संदर्भ: संपा: सुहास पळशीकर, नितीन बिरमल

२३ एप्रिल २०१५ ला औरंगाबाद आणि नवी मुंबई पालिकेचे निकाल लागले. निकाल जरी अपेक्षित असले (माझ्यासाठी तरी) या निवडणुकीत सतांतर होईल असे वरकरणी तरी वाटत नव्हते. 
मुळात लोकसभा/विधानसभा निवडणुकींचा प्रभाव हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर नसतोच. 

    १९९५ साली महाराष्ट्रात सत्तांतर झाले तेव्हा युतीचे सरकार सत्तेवर आले आणि ते १९९९ पर्यंत टिकले. या पाच वर्षांच्या कालावधीत जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तिथे युतीला फारसे यश मिळाले नाही, तिथे काँग्रेसनेच बाजी मारली. २००९ साली विधानसभा निवडणुकीत सेनेला मुंबईत ४ जागा मिळाल्या होत्या आणि मनसेला ६. परंतु २०१२ साली झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सेनेने गड राखला. 

    १९९२ पासून नवी मुंबईवर नाईकांचे वर्चस्व आहे (मग ते कुठल्याही पक्षात असो). आणि औरंगाबादेत शिवसेनेचे वर्चस्व आहे. आणि या निवडणुकीमुळे ते पुन्हा अधोरेखित झाले आहे. नवी मुंबईत सेनेचे आणि औरंगाबादेत MIM चे वाढलेले बळ हे दोन्ही सत्ताधार्‍यांना डोईजड जाणार आहे.

     MIM चा प्रवेश हा गेल्या विधानसभेत नव्हते तर २०१२ साली झालेल्या नांदेड महानगरपालिकेतच झाला होता. ८१ जागा असलेल्या नांदेड महानगरपालिकेत MIM ने २३ जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी ११ जागा निवडून आणल्या होत्या, ११ ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांचा परभवास कारणीभूत ठरला. ही धोक्यांचे घंटा काँग्रेसला तेव्हाच कळायली हवी होती. आता औरंगाबादेत MIM चे संख्याबळ २२ वर आहे ती सेनेला डोकेदुखी ठरणार आहे. 

    नवी मुंबईत सुध्दा सेनेने ४४ जागा जिंकून आपले वर्चस्व अधोरेखित केलेले आहे. भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे. जगातला सर्वाट मोठा पक्ष असूनही एवढी कमी मते कशी काय? भाजपने या गोष्टीचा विचार करावयास हवा.

२०१७ ला म्हणजे अजून २ वर्षांनी महाराष्ट्रातील १२ महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्यात मुंबई महानगरपालिका जिचा अर्थसंकल्प केरळ राज्याएवढे आहे, ठाणे महानरपालिका जिचा अर्थसंकल्प गोवा राज्याएवढा आहे, पिंपरी-चिंचवड  महानगरपालिका जिचे आशियातील सर्वात जास्त उत्पन्न अशी महानगरपलिकांचा समावेश आहे. त्या वेळी काय होइल हे पाहण्याचे औत्स्युक्य असेल.मनसे या सगळ्यात कशातच नव्हती. राज ठाकरेंची काय भुमिका असेल यावर सगळ्यांचे लक्ष असेल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.