www.24taas.com, वॉशिंग्टन
तुम्हाला कमी झोप असेल. तुम्ही कमी झोपत असाल तर.. अति जागरण करीत असाल तर तुमचे काही खरे नाही. किमान सहा तास व्यवस्थित झोप घेतली नाही तर तुमची कायमची झोप उडाली समजा. व्यवस्थित झोप घेतली नाही तर स्ट्रोकची लक्षणे मोठ्या संख्येने दिसून येतात.
अमेरिकेतील बोस्टनच्या असोसिएटप्रोफेशनल स्लीप सोसायटीच्या २६ व्या वार्षिक बैठकीत या संशोधनाची माहिती देण्यात आली. या पाहाणीसाठी सर्वसामान्य उंचीच्या तसेच ज्यांच्यामध्ये स्ट्रोकची कोणतीही लक्षणे नाहीत अशा पाच हजारांपेक्षा जास्त लोकांची निवड करण्यात आली होती.
बॉडी इंडेक्स मास आणि झोपेबाबत संशोधन करणार्यांना असे दिसून आले की, जे मध्यमवयीन तसेच वृद्ध लोक रोज सहा तासांपेक्षा कमी वेळ झोपतात त्यांच्यामध्ये स्ट्रोकची लक्षणे मोठ्या संख्येने दिसून आली.
अधिक वजन असलेल्या लोकांवर झोपेचा काय परिणाम होते हे या संशोधनातून सांगितलेले नाही. मात्र, कमी झोप अनेक बाबतीत धोकादायक ठरू शकते हे निष्पन्न झाले आहे.