Micro Cheating म्हणजे काय? नात्यांमध्ये दुरावा आणणारा नेमका काय हा प्रकार?

Signs Of Micro Cheating: जर तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत असेल तर या संकेतावरुन ओळखा. यामध्ये Micro Cheating का आहे चर्चेत? काय आहे हा प्रकार. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 5, 2024, 10:02 AM IST
Micro Cheating म्हणजे काय? नात्यांमध्ये दुरावा आणणारा नेमका काय हा प्रकार? title=

Micro Cheating in Relationship: नात्यामध्ये अनेकदा पार्टनर चीटिंग करतात. यामुळे नातं टिकणं कठीण होतं. रिलेशनशिपमध्ये धोका देण्याबाबत एक नवीन टर्म चर्चेत आहे. यामध्ये मायक्रो चीटिंग म्हटलं जातं. हे मायक्रो चीटिंग म्हणजे काय? याच्या नात्यावर काय परिणाम होतो? 

मायक्रो चीटिंग म्हणजे काय? 

तुमचा लव्ह पार्टनर दुसऱ्या व्यक्तीशी जवळीक साधत आहे. लोक ऑफिसमध्ये घरापासून दूर जास्त वेळ घालवतात, त्यामुळे ते त्यांचे विचार इतरांसोबत शेअर करू लागतात. अशा स्थितीत हळूहळू दुसऱ्या व्यक्तीशीच जवळीक वाढू लागते. आजकाल मायक्रो चीटिंगमुळे अनेक नाती प्रभावित होत आहेत. तुमच्यापैकी बरेच जण असतील ज्यांनी याबद्दल वाचले किंवा ऐकले असेल. पण तरीही बहुतेक लोकांकडे याविषयी कमी माहिती असेल.

मायक्रो चीटिंग म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत असताना दुसऱ्या व्यक्तीशी जवळीक साधू लागतो. हे जाणूनबुजून किंवा नकळत घडते. आजकाल बहुतेक लोक त्यांचा वेळ घरी नसून ऑफिसमध्ये घालवतात. अशा स्थितीत ते जाणूनबुजून किंवा नकळत अनेक गोष्टी इतरांसोबत शेअर करू लागतात आणि हळूहळू त्यांना त्यांच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टीही सांगू लागतात आणि याला मायक्रो चीटिंग म्हणतात. या ठिकाणी Micro Cheating होते. तुमचा पार्टनर मायक्रो चीटिंग करत आहे हे तुम्हाला या लक्षणांवरून कळू शकते.

वाद वाढतात 
पार्टनर जेव्हा चीटिंग करतो तेव्हा नात्यामध्ये वाद वाढतात. एकमेकांच्या भांडणांच प्रमाण वाढतं. रिलेशनशिपमध्ये धोका देत असताना नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. 

फोनवर कायम व्यस्त
जर तुमचा जोडीदार सतत फोनवर व्यस्त असेल तर याचा अर्थ असा होऊ शकतो की  तुमची फसवणूक होत आहे. मात्र, अशा स्थितीत शंका घेण्याऐवजी मोकळेपणाने बोलले पाहिजे. 

नात्यामध्ये आनंद नाही
जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी गेलात तर तो तुमच्यासोबत नीट एन्जॉय करू शकत नाही. असे होत असेल तर ते Micro Cheatingचे लक्षण असू शकते.

फोनवर डेटिंग ॲप्स
जर तुमच्या पती किंवा पत्नीच्या फोनवर डेटिंग ॲप्स असतील तर यावरुन कळते की, तो किंवा ती तुमची फसवणूक करत आहे. जेव्हा तुम्हाला अशी चिन्हे दिसतात तेव्हा तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.