'मी रडत होतो, तो रडत होता, 15 वर्षात पहिल्यांदाच...', रोहित शर्मावर विराट पहिल्यांदाच मनमोकळा बोलला; पाहा Video

Virat Kohli Emotional : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर काय भावना होत्या? यावर बोलताना विराटने रोहित शर्मासोबतचा (Virat Kohli On Rohit Sharma) किस्सा सांगितला. त्यावेळी वानखेडेवर टाळ्यांचा कडकडाट झाला.

सौरभ तळेकर | Updated: Jul 4, 2024, 11:46 PM IST
'मी रडत होतो, तो रडत होता, 15 वर्षात पहिल्यांदाच...', रोहित शर्मावर विराट पहिल्यांदाच मनमोकळा बोलला; पाहा Video title=
Virat Kohli Emotional Statement On Rohit Sharma in wankhede

Virat Kohli On Rohit Sharma : टीम इंडिया मायदेशी परत आल्यानंतर त्यांचं जल्लोषात स्वागत केलं गेलं. मरिन ड्राईव्ह ते वानखेडेपर्यंत निघालेल्या रॅलीमध्ये हजारो चाहत्यांनी तुडूंब गर्दी केली होती. अशातच वानखेडेवर झालेल्या बक्षिस वितरण सोहळ्यावेळी विराटने 'मन की बात' बोलून दाखवली. रोहित शर्मा आणि तुझा फोटो तुफान व्हायरल झाला होता. त्याने इंटरनेट देखील ब्रेक केलं होतं. यावर तुझी प्रतिक्रिया काय? असा सवाल जेव्हा विराटला विचारला गेला. तेव्हा त्याने मनातील भावना व्यक्त केल्या. विराट कोहली रोहित शर्माविषयी पहिल्यांदाच एवढ्या मनमोकळेपणाने बोलताना दिसला.

काय म्हणाला Virat Kohli ?

गेल्या 15 वर्षांच्या करिअरमध्ये मी पहिल्यांदाच रोहित शर्मा खेळताना एवढं इमोशनल होताना पाहिलंय. आमच्या फोटोने इंटरनेट ब्रेक केलं की नाही माहित नाही. पण जेव्हा आम्ही जिंकलो आणि आम्ही पायऱ्यांवर पोहोचलो, तेव्हा मी रडत होतो, तो रडत होता... आम्ही मिठी मारली... आमच्यासाठी हा क्षण नक्कीच आनंदाचा होता, असं विराट कोहलीने म्हटलं आहे. 

रोहित आणि मी, आम्ही खूप दिवसांपासून यासाठी प्रयत्न करत आहोत. आम्हाला नेहमीच विश्वचषक जिंकायचा होता. ट्रॉफी वानखेडेवर परत आणणं ही एक खास भावना आहे, असंही विराटने यावेळी म्हटलं. विराटने यावेळी जसप्रीत बुमराहचं तोंडभरून कौतूक केलं. आम्ही खूप नशिबवान आहोत की जसप्रीत बुमराह आमच्यासोबत खेळत आहे. बुमराहसारखा गोलंदाज क्वचितच एक जनरेशनमध्ये दिसतो.

दरम्यान, विराटने बुमराहचं कौतूक करताच वानखेडेवर बुमराहच्या नावाच्या घोषणा ऐकायला मिळाल्या. बुमराह एक असा गोलंदाज होता, त्याने आम्हाला प्रत्येकवेळी सामन्यात कमबॅक करून दिलं. त्यामुळे त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, असं विराट कोहलीने म्हटलं अन् वानखेडेवर टाळ्यांचा कडकडाट झाला.