www.24taas.com, लंडन
आत्तापर्यंत फारशा चर्चेत नसलेल्या टिंटू लुकामुळे भारतानं लंडन ऑलिम्पिक 2012’मध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकलंय. भारताच्या या अव्वल धावपटूनं 800 मीटर शर्यतीच्या सेमीफायनलपर्यंत धडक मारलीय.
टिंटू लुका ही भारताची माजी धावपटू पी. टी. उषा हिची शिष्या आहे. पात्रता फेरीत ०२:००:७५ अशी वेळ नोंदवत तिसऱ्या स्थानावर तिनं मजल मारली. त्यामुळे टिंटू आता सेमीफायनलसाठी पात्र ठरलीय. ही सेमीफायनल उद्या म्हणजे गुरुवारी होणार आहे. सेमीफायनलमध्ये तिच्याकडून पदकाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या शर्यतीत जमैकाची धावपटू व्हेरोनिका कॅम्पबेल ही सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. यापुर्वी तिने लागोपाठ दोन ऑलिम्पिक सुवर्णपदक प्राप्त केले आहेत. ती हॅट्ट्रिक पूर्ण करण्याच्या इराद्याने धावेल. हे लक्ष्य तिने साध्य केले तर असा विक्रम नोंदविणारी ती पहिलीच महिला धावपटू ठरेल. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकाची वादग्रस्त धावपटू कास्टर सेमेन्या हीदेखील सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे.
.