www.24taas.com, लंडन
भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंगच ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. मेडलची अपेक्षा असणाऱ्या विजेंदरला फार मोठा धक्का बसला आहे. क्वार्टर फायनलमध्ये विजेंदर सिंगला ७५ किलो वजनी गटात पराभवाला सामोर जाव लागलं आहे.
क्वार्टर फायनलमध्ये उझबेकिस्तानच्या अब्बॉस अटोवाने विजेंदरला १७-१३ ने पराभूत केल. या पराभवामुळे विजेंदरच लंडन ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्यास स्वप्न भंगलं आहे. दरम्यान बिजींगमध्ये विजेंदरने भारताला ७५ किलो वजनी गटात ब्राँझ मेडलची कमाई करून दिली होती.
बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक पटकावणार्या हिंदुस्थानच्या विजेंदर सिंगने पुरुषांच्या ७५ किलो मिडलवेट प्रकारात अमेरिकेच्या टेरेल गॉशावर १६-१५ अशा फरकाने रोमहर्षक विजय मिळवला होता आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. विजेंदर पदकापासून फक्त एक पाऊल दूर होता. उपांत्य फेरीत धडक मारल्यास त्या खेळाडूचे पदक निश्चित होते.
[jwplayer mediaid="151646"]