Olympic - मेरी कोम सेमीत, पदक निश्चित

भारताच्या वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर मेरी कोम हिने लंडन ऑलिम्पिकच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. तिने ट्युनिशियाच्या राहिलचा १५-६ ने पराभव करत सेमी फायनलमध्ये शानदार प्रवेश मिळविला.

Updated: Aug 6, 2012, 07:20 PM IST

www.24taas.com, लंडन

भारताच्या वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर मेरी कोम हिने लंडन ऑलिम्पिकच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. तिने ट्युनिशियाच्या राहिलचा १५-६ ने पराभव करत सेमी फायनलमध्ये शानदार प्रवेश मिळविला.

 

मेरी कोमने चार राऊंडमध्ये पहिल्या पासूनच आघाडी घेतली होती. तिने पहिला राऊंड २-१, दुसरा राऊंड ५-३, तिसरा राउंड ११-४, आणि चौथ्या आणि अंतीम राऊंडमध्ये १५-६ अशी आघाडी घेत बाजी मारली.

 

सेमी फायनलमध्ये मेरीचा सामना ग्रेट ब्रिटनच्या अॅडम निकोलाशी होणार आहे. येत्या बुधवारी सायंकाळी सहा वाजता हा सामना सुरू होणार आहे.