पोर्तुगालचा विजयासाठी झगडा

पोर्तुगालने लविव येथे झालेल्या रंगतदार लीग मॅचमध्ये डेन्मार्कचा ३-२ नं पराभव करत युरो कपमधील पहिल्या विजयाची नोंद केली. डेन्मार्कतर्फे निकलस बेंटनरने दोन्ही गोल्स झळकावले.

Updated: Jun 14, 2012, 07:33 AM IST

www.24taas.com, लविव

पोर्तुगालने लविव येथे झालेल्या रंगतदार लीग मॅचमध्ये डेन्मार्कचा ३-२ नं पराभव करत युरो कपमधील पहिल्या विजयाची नोंद केली. डेन्मार्कतर्फे निकलस बेंटनरने दोन्ही गोल्स झळकावले. जर्मनीविरूद्ध पहिली मॅच गमावलेल्या पोर्तुगालकरता टुर्नामेंटमधील आपलं आव्हान कायम राखण्याकरता या मॅचमध्ये विजय मिळवणं आवश्यक होतं.

.

पोर्तुगालने डेन्मार्कविरूद्ध खेळताना ऑलराऊंड परफॉर्मन्स देत डच टीमचा ३-२ नं पराभव करत युरो कपमधील पहिल्या विजयाची नोंद केली. डिफेंडर गुआर्डिओला पेपे आणि स्ट्रायकर हेल्डर पोस्टीगाने गोल करत पोर्तुगालला फर्स्ट हाफमध्ये आघाडी मिळवून दिली. मात्र, फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफमध्ये डेव्हिस स्ट्रायकर निकलस बेंटरनं दोन गोल करत डेन्मार्कला पोर्तुगालशी बरोबरी करून दिली. अखेर मॅचच्या  ८८ व्या मिनिटाला सिल्व्हेस्टर वरेलाने पोर्तुगालकरता विजयी गोलची नोंद केली. लीगच्या पहिल्या मॅचमध्ये जर्मनीकडून पराभवाचा धक्का पचवलेल्या पोर्तुगालकरता टुर्नामेंटमधील आपलं आव्हान कायम राखण्याकरता विजयाची आवश्यकता होती. डेन्मार्कविरूद्ध खेळताना पोर्तुगालने सुरूवातीपासूनच आक्रमणावर भर दिला.  अखेर मॅचच्या २४व्या मिनीटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर डिफेंडर गुआर्डिओला पेपेने हेडरवर अप्रतिम गोल करत पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली. तर ३६ व्या मिनिटाला नानीच्या क्रॉस पासवर स्ट्रायकर पोस्टीगाने बॉल गोल पोस्टमध्ये मारत पोर्तुगालला २-० ने आघाडी मिळवून दिली.

.

मात्र, फर्स्ट हाफ संपायला ५ मिनिटं बाकी असताना निकलस बेंटरने हेडरद्वारे गोल करताना डेन्मार्ककरता गोलचं खातं उघडलं. सेकंड हाफमध्ये पोर्तुगालने अनेकदा गोल करण्याची संधी गमावली. मॅच संपायला ११ मिनिटं बाकी असताना निकलस बेंटरने पुन्हा एकदा पोर्तुगाल धक्का दिला. ८० व्या मिनिटाला बेंटरने डेन्मार्ककरता सेकंड गोल करत बरोबरी साधून दिली. त्यामुळे ही मॅचही ड्रॉ अवस्थेतच संपणार असं वाटत असतानाच सबस्टीट्यूट म्हणून आलेल्या २७ वर्षीय सिल्व्हेस्टर वरेलाने ८८ व्या मिनिटाला पोर्तुगालकरता तिसरा गोल केला आणि स्टेडियममध्ये उपस्थित हजारो पोर्तुगाल फॅन्सनी विजयी जल्लोष साजरा केला. एक पराभव आणि एक विजयासह पोर्तुगाल आता नेदरलँड्सचा सामना करण्यास सज्ज झालीय.

.