euro cup 2012

जर्मनी-इटलीमध्ये आज दुसरी सेमी फायनल

विजयाची प्रबळ दावेदारी मानली जाणारी जर्मनी आणि इटलीमध्ये दुसरी सेमी फायनल रंगणार आहे. आता सर्वाधिक वेळा युरो कपचे विजेतपद पटकावलेली जर्मनी की याआधी जर्मनीला सर्वाधिक वेळा पराभूत करणारी इटली फायनल गाठते हे पाहण रंजक ठरणार आहे.

Jun 28, 2012, 11:25 AM IST

युक्रेनवर कुरघोडी करत इंग्लंड टॉप पोझिशनवर

इंग्लंड विरूद्ध युक्रेन यांच्यात झालेल्या नाट्यपूर्ण मॅचमध्ये इंग्लंडने वेन रूनीने केलेल्या गोलच्या जोरावर, यजमान युक्रेनचा १-० ने पराभव करत ग्रुप डी पॉईंट टेबलमध्ये टॉप पोझिशनवर कब्जा केला. या विजयामुळे क्वार्टर फायनलमध्ये इंग्लंडपुढे आव्हान असणार आहे ते इटलीचं.

Jun 20, 2012, 09:18 AM IST

युरो २०१२ : फ्रान्सची युक्रेनवर सहज मात

ग्रुप 'डी' मध्ये फ्रान्सनं युक्रेनवर २-० ने सहज विजय मिळवला. मेनेझ आणि कबाईने प्रत्येकी एक गोल करत फ्रान्सला हा विजय मिळवून दिला. दरम्यान, प्रथमच युरो कपमध्ये सहभागी झालेल्या युक्रेनने फ्रान्सला पहिल्या हाफमध्ये चांगलीच टक्कर दिली.

Jun 16, 2012, 07:27 AM IST

स्पेननं आयर्लंडला अक्षरश: चारली धूळ...

गतविजेत्या स्पेनने लीगमधील पहिल्या विजयाची नोंद केलीय. ग्रुप सीमध्ये दुबळ्या आयर्लंडवर स्पेनने ४-० ने विजय मिळवत ग्रुपमध्ये अव्वल स्थान काबिज केलंय. स्ट्रायकर फर्नांडो टोरेस स्पेनच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

Jun 15, 2012, 07:49 AM IST

क्रोएशियाची आघाडी कायम...

इटली विरूद्ध क्रोएशिया मॅच १-१ ने बरोबरीत सुटली आणि कोएशिएन फॅन्सनी स्टेडियममध्ये जल्लोष केला. आयर्लंडविरूद्ध हिरो ठरलेल्या मांझुकेसने इटलीविरूद्ध गोल झळकावताना क्रोएशियाला बरोबरी साधून दिली. त्यामुळे इटलीला सलग दुस-या मॅचमध्ये ड्रॉ वर समाधान मानावं लागलं असून क्रोएशियाने पॉईंट टेबलमध्ये टॉप पोझिशन मिळवलीय.

Jun 15, 2012, 07:29 AM IST

पोर्तुगालचा विजयासाठी झगडा

पोर्तुगालने लविव येथे झालेल्या रंगतदार लीग मॅचमध्ये डेन्मार्कचा ३-२ नं पराभव करत युरो कपमधील पहिल्या विजयाची नोंद केली. डेन्मार्कतर्फे निकलस बेंटनरने दोन्ही गोल्स झळकावले.

Jun 14, 2012, 07:33 AM IST

जर्मनीची युरो कपच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक

नेदलँड्सला पराभूत करत जर्मनीनं युरो कपच्या क्वार्टर फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केलाय. मारियो गोमेझ पुन्हा एकदा जर्मनची विजयाचा खऱ्या अर्थानं हिरो ठरला. मात्र, या पराभवामुळे नेदरलँड्सचं टुर्नामेंटमधील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.

Jun 14, 2012, 07:18 AM IST

इंग्लंडनं फ्रांसला बरोबरीत रोखलं

युरो कप २०१२ मध्ये ग्रुप ‘डी’च्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं फ्रांसला १-१ च्या बरोबरीत रोखलंय. युक्रेनमधल्या डोनेत्सक शहरातल्या डोनबास ऐराना स्टेडिअमवर सोमवारी हा सामना रंगला. फ्रांस गतवर्षीची विजयी टीम आहे.

Jun 12, 2012, 07:57 AM IST

विठू नामाचा गजर अन् युरो कपचा थरार...

महाराष्ट्राचा आनंद सोहळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या वारीला सुरूवात झालेली आहे. तर दुसरीकडं फूटबॉल वर्ल्ड कपनंतर महत्त्वाची अशी युरो कप टूर्नामेंट पोलंड आणि युक्रेनमध्ये आजपासून सुरू होणार आहे.

Jun 8, 2012, 01:07 PM IST

युरो कप जिंकणार तरी कोण?

आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात क्रीडा फॅन्सना लंडन ऑलिम्पिकपूर्वी वेध लागले आहेत ते युरो कप 2012 टूर्नामेंटचं...फूटबॉल वर्ल्ड कपनंतर महत्त्वाची अशी युरो कप टूर्नामेंट पोलंड आणि युक्रेनमध्ये पार पडणार आहे.

Jun 5, 2012, 04:35 PM IST