ट्रायलथॉनमध्ये मुंबईच्या स्वप्नालीची कमाल

अतिशय टफ रेस म्हणून ट्रायलथॉनकडे पाहण्यात येतं. याच ट्रायलथॉनमध्ये मुंबईच्या स्वप्नाली यादवनं आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. स्वप्नाली यादवनं मलेशियन ट्रायलथॉन रेसमध्ये रजत पदक पटकावलंय.

Updated: Jun 5, 2012, 07:44 PM IST

 www.24taas.com, मुंबई  

 

अतिशय टफ रेस म्हणून ट्रायलथॉनकडे पाहण्यात येतं. याच ट्रायलथॉनमध्ये मुंबईच्या स्वप्नाली यादवनं आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. स्वप्नाली यादवनं मलेशियन ट्रायलथॉन रेसमध्ये रजत पदक पटकावलंय.

 

ट्रायलथॉन... शरिराची कस पाहणारा एक इव्हेंट... स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग हे तिन्ही क्रीडाप्रकार एकत्रित असणारी ही शर्यत अतिशय कठीण समजली जाते. मुंबईच्या स्वप्नाली यादवनं मात्र या अवघड शर्यतीत आपला वेगळा ठसा उमटवलाय. खडतर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर १३ वर्षीय स्वप्नालीनं  मलेशियातील ज्युनिअर्सच्या ट्रायलथॉन स्पर्धेत रजत पदक मिळवत आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. या स्पर्धेत स्वप्नालीनं ३०० मीटर स्विमिंग ५ मिनिटं १ सेंकदात पूर्ण केलं. त्यानंतर ८ किलोमीटर सायकलिंगचा टप्पा तीनं १६ मिनिटे ४१ सेकंदात गाठला. तर २ किलोमीटरचा धावण्याचा टप्पा ११ मिनिट २३ सेकंदात पूर्ण करत तिनं या स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावलं.

 

गेल्या ६ वर्षात स्वप्नालीनं  अनेक स्विमिंग स्पर्धा गाजवल्यात. ग्रीस, बर्मुडा आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या स्पर्धेत तिनं आपली छाप सोडली. आता आंतरराष्टीय ट्रायलथॉनमध्ये तीनं देशासाठी चमकदार कामगिरी करून दाखवलीय. मलेशियन ट्रायलथॉन रेसमध्ये चीन, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसह १६९ देशातील स्पर्धक सहभागी झाले होते. मात्र स्वप्नालीनं त्यांच्यावर मात केली. आता सिनिअर ग्रुपमध्येही आंतरराष्ट्रीय स्तरावर मेडल मिळवण्याचं ध्येय स्वप्नालीसमोर आहे.

 

.