ऑलिम्पिक खेळाडूंसाठी सडलेला ज्यूस...

आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या आणि सध्या लंडन ऑलिम्पिकची तयारी करत असलेल्या भारतीय कुस्तीपटूंना आपल्या भारतातच मिळालाय सडलेल्या फळांचा ज्यूस...

Updated: Jun 5, 2012, 05:50 PM IST

 www.24taas.com, नवी दिल्ली  

 

आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या आणि सध्या लंडन ऑलिम्पिकची तयारी करत असलेल्या भारतीय कुस्तीपटूंना आपल्या भारतातच मिळालाय सडलेल्या फळांचा ज्यूस... ज्यांच्याकडून सगळा भारत मेडलची अपेक्षा करतोय त्या खेळाडूंनी ही कल्पनाही केली नसेल. पण असं घडलंय हे खरं... हरियाणाच्या सोनीपतमध्ये ट्रेनिंग दरम्यान भारतीय कुस्तीपटूंना आपण खाऊ शकणार नाही अशा सडलेल्या फळांचा ज्यूस दिला गेला.

 

‘हे सर्व बिनदिक्कतपणे सुरू असताना मी स्वत: किचनमध्ये जाऊन बघितलं. तिथे खराब-सडलेल्या फळांचा ज्यूस बनवला जात होता आणि हाच ज्यूस खेळाडूंनाही दिला जात होता’, ही हकिकत व्यक्त केलीय माजी जलपटू आणि खेळ मंत्रालयाच्या मॉनिटरिंग पॅनलचे सदस्य खजान सिंह यांनी... तसंच कोणत्याही मेडिकल एक्सपर्टच्या सल्ल्याशिवाय या ट्रेनिंग सेंटरमध्ये खेळाडूंना जेवण दिलं जातं, असंही त्यांनी म्हटलंय.

 

खजान सिंह हे १९८६ च्या एशियन गेम्सचे रजत पदक विजेते आहेत. आणि ही घटना ज्या ट्रेनिंग सेंटरमध्ये घडली तिथंच बिजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणारा सुशीलकुमारही सध्या ट्रेनिंग घेतोय.

 

.