युरो कप जिंकणार तरी कोण?

आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात क्रीडा फॅन्सना लंडन ऑलिम्पिकपूर्वी वेध लागले आहेत ते युरो कप 2012 टूर्नामेंटचं...फूटबॉल वर्ल्ड कपनंतर महत्त्वाची अशी युरो कप टूर्नामेंट पोलंड आणि युक्रेनमध्ये पार पडणार आहे.

Updated: Jun 5, 2012, 04:35 PM IST

www.24taas.com, विनीत डंभारे, मुंबई

 

आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात क्रीडा फॅन्सना लंडन ऑलिम्पिकपूर्वी वेध लागले आहेत ते युरो कप 2012 टूर्नामेंटचं...फूटबॉल वर्ल्ड कपनंतर महत्त्वाची अशी युरो कप टूर्नामेंट पोलंड आणि युक्रेनमध्ये पार पडणार आहे...8 जून ते 1 जुलैपर्यंत रंगणा-या युरो कप टूर्नामेंटमध्ये एकुण 16 युरोपियन टीम्स चॅम्पियनशीपकरता एआंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वातील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे फूटबॉल...फूटबॉल वर्ल्ड कप आणि त्यानंतर युरो कप या दोन स्पर्धाकडे सर्व जगाच लक्ष लागलं असतं...1960 सालापासून सुरू झालेल्या या युरो कप यंदा पोलंड आणि युक्रेनमध्ये होतोय..यंदा युरोपातील 16 टीम्स चार ग्रुपमध्ये विजेतेपदासाठीची झुंजणार आहे. ग्रुप एमध्ये यजमान पोलंडसह  ग्रीस,रशिया आणि चेक रिपब्लिकचा समावेश आहे...तर बी ग्रुप या ग्रुप ऑफ डेथ आहे.. आफ्रिकेत पार पडलेल्या वर्ल्ड कप टूर्नामेंटचे उपविजेते असणा-या नेदरलँडया ग्रुपमध्ये आहे..तसंच डेन्मार्क, जर्मनी आणि पोर्तुगालचं कडवं आव्हान डच टीमसमोर असणार आहे...

 

ग्रुप सीमध्ये वर्ल्ड कप विजेते आणि युरो कपचे गतविजेता स्पेनसह इटली, आयर्लंड आणि क्रोएशियव टीम आमनेसामने असतील...युरो कप 2012ची फायनल जिथे रंगणार आहे त्या युक्रेनला ग्रुप डीमध्ये स्वीडन, फ्रांस आणि इंग्लंडसह स्थान देण्यात आलंय. युरो कपचे दावेदार म्हणून जर्मनी, गतविजेते स्पेन आणि फ्रांसची टीम प्रमुख दावेदार आहे. तर इटली,पोर्तुगाल, ग्रीस आणि डेन्मार्कही धक्कादायक कामगिरीची नोंद करण्याची क्षमता ठेवतायत. यंदा युरो कपमध्ये सर्व फुटबॉल फॅन्सचं लक्षं लागलेलं असणार ते गतविजेत्या स्पेनकडे. स्पेनने 2010मध्ये दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या वर्ल्ड कपवरही नाव कोरलंय..त्यामुळे पुन्हा एकदा युरो कप जिंकून सलग दोनवेळा युरो कप जिंकण्याची किमया ते साधण्यात यशस्वी ठरतात का याचीच उत्सुक्ता सर्वांना लागलीय...कार्लोस पुयोल आणि डेव्हिड विलाच्या दुखापतग्रस्त होण्यान स्पॅनिश टीमला धक्का बसला असला तरी झावी हर्नांडेझ, फॅब्रिगास, सर्जिओ रामोस आणि आंद्रे इनिएस्ता यांच्यावर स्पेनची मदार असणार आहे...टोरेस, लॉरेन्टो आणि नेग्रोडो यांच्याकडूनही स्पेनला बहारदार खेळाची अपेक्षा असणार आहे....तर दुसरीकडे नेदरलँडही वर्ल्ड कपच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक असणार...नेदरलँडच्या टीममध्ये विविध आंतरराष्ट्रीय क्लब्जमध्ये खेळणा-या स्टार प्लेअर्सचा भरणा आहे. नेदरलँडची प्रमुख मदार असणार आहे ती वेस्ले श्नाईडर आणि स्टार स्ट्रायकर क्लास हंटेलकवर... कॅप्टन वॅन बोमेलच्या नेतृत्वाखाली डच टीमचा खेळ चांगलाच बहरताना दिसतोय...1972, 1980 आणि 1996 असं तीन वेळा युरो कप जिंकणा-या जर्मनीला यावेळी जबरदस्त आव्हान असणार..

 

बराच मोठा फॅन फॉलोविंग असणा-या जर्मनीपुढे ग्रुप स्टेजमध्ये पोर्तुगाल, डेन्मार्क, नेदरलँडचं कडवं आव्हान असणार आहे...जर्मनीचा डिफेंस या टूर्नामेंटमध्ये महत्त्वाचा ठरणार .. मॅट्स हमल्स, हॉगलस बॅडस्टबर आणि जेरोम बोटंगसारख्या प्लेअर्सचा डिफेंस भेदण्याचं आव्हान प्रतिस्पर्ध्यांसमोर असणार. तर पोडोल्सकी,सेबेस्टीयन श्वाईन्स्टेगर, मेसुत ओझिल आणि मिरोस्लाव क्लोससारखीआक्रमक फळी टूर्नामेंटदरम्यान गोल्सचा पाऊस पाडण्यास उत्सुक असणार... टूर्नामेंटदरम्यान फूटबॉल फॅन्सचं लक्षं वेधलेलं असणार आहे ते ख्रिस्टीयानो रोनाल्डो खेळत असलेल्या पोर्तुगालकडे...वर्ल्ड कप दरम्यान पोर्तुगालची जबरदस्त कामगिरी झाली होती...मात्र त्यांना स्पेनकडून पराभवाचा धक्का पचवावा लागला होता...याआधी पोर्तुगाल 2004मध्ये युरोचे रनरअप ठरले होते...तर 1984 मध्ये त्यांनी सेमीफायनल गाठली होती...रोनाल्डोसह रॉल मिअरलेस आणि नॅनी, गोल्स झळकावण्यास सज्ज असणार आहेत...युरो कपच्या दावेदारांपैकी एक असणा-या फ्रांसची वर्ल्ड कपदरम्यान खराब कामगिरी झाली होती... फ्रांसची टीम सध्या प्लेअर्सची बंडखोरी आणि मॅनेजमेंटमध्ये असणा-या वादांतून जातेय...

 

तरीही टूर्नामेंटमध्ये फ्रांसही फेव्हरीट आहे...प्रॅट्रिक एविअरा, अनेल्का तसंच योवान गौरफक आणि करीम बेनझेमा यांच्या खेळावर फ्रांसची टूर्नामेंटमधील वाटचाल अवलंबून असणार आहे... वर्ल्ड कपमध्ये फ्लॉप ठरलेली इंग्लिश टीम युरो कपमध्ये आपल्या कामगिरीला साजेसा परफॉर्मन्स करण्याची तयारी करतेय... इटलीच्या टीमला 2006 वर्ल्ड