सावकाश भोजन, मधुमेहावर नियंत्रण

आपल्याला मधुमेह होऊ नये, असं तुम्हाला वाटत असेल, तर त्यावर एक सोपा उपाय आहे. सावकाश जेवल्यास यावर उपाय मधुमेह होत नाही, असा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे.

Updated: May 9, 2012, 04:38 PM IST

www.24taas..com

आपल्याला मधुमेह होऊ नये, असं तुम्हाला वाटत असेल, तर त्यावर एक सोपा उपाय आहे. सावकाश जेवल्यास यावर उपाय मधुमेह होत नाही, असा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे.

लिथुवानियन यूनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायंसच्या संशोधकांनी निष्कर्ष काढला आहे की जे लोक भराभर जेवतात, त्यांना टाइप-२ मधुमेह होण्याचा धोका सावकाश जेवणाऱ्यांच्या तुलनेत अडीच पटींनी वाढतो.

या पूर्वीच्या संशोधनात भरभर जेवणाचा संबंध स्थुलपणाशी जोडला जात होता. मात्र आहार सेवनाचा वेग आणि मधुमेह यांच्यातील संबंध पहिल्यांदाच या संशोधनातून समोर आला आहे. घाईघाईत जेवल्यास टाइप-२ मधुमेह होण्याचा धोका कसा वाढतो, यावर स्वतंत्रपणे संशोधन सुरू करण्यात आलं आहे.