नियमित जॉगिंग बनवतं दीर्घायुषी

नियमितपणे जॉगिंग केल्यास आपलं आयुष्य पाच ते सहा वर्षांनी वाढू शकतं. शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे. डेन्मार्कमध्ये हृदयासंबंधी होणाऱ्या अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी हा दावा केला आहे.

Updated: May 5, 2012, 04:15 PM IST

www.24taas.com, कोपनहेगन

नियमितपणे जॉगिंग केल्यास आपलं आयुष्य पाच ते सहा वर्षांनी वाढू शकतं. शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे. डेन्मार्कमध्ये हृदयासंबंधी होणाऱ्या अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी हा दावा केला आहे.

आठवड्यातून एक ते अडीच तास जॉगिंग केल्यास आयुर्मान वाढतं. अधिक काळ जगण्चा हा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग आहे. आता जॉगिंगचे होणारे फायदे या विषयावर निश्चित माहिती देण्याच्या स्थितीत आम्ही आलो आहोत. असं हृदय अभ्यासक पीटर शनोह यांनी म्हटले आहे. पीटर शिनोह हे कोपनहेगन सिटी हार्ट स्टडी चे प्रमुख आहेत. जॉगिंगने आयुष्य वाढतं, या दाव्याला शनोह यांनी मान्यता दिली आहे.

रोज अर्धा तास जॉगिंग आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असते. शहरात हल्ली मोठ्या प्रमाणावर जॉगिंग ट्रॅक्स बांधले गेले आहेत. याशिवाय जर जॉगिंग ट्रॅक्स उपलब्ध नसतील, तर घरच्या घरीही एका जागी उभे राहून जॉगिंग करता येऊ शकतं. अशा जॉगिंगमुळे हृदयावरील ताण हलका होतो आणि त्यामुळे आयुर्मान वाढते.