माहितीच्या खजिन्यासाठी उघडा गुगलची 'झिप'

आज जर गुगलवर पहाल तर चक्क गुगल झिप चेनने उघडावं लागतंय असं दिसेल. ही अद्भुत कल्पना आज गुगलवर मांडली जात आहे, कारण आज झिप चेनचा शोध लावणाऱ्या गिडिओन संडबॅक यांची जयंती आहे. झिप चेनच्या जनकाला गुगल डुडलने दिलेली ही आगळी वेगळी आदरांजली आहे.

Updated: Apr 24, 2012, 05:58 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

गुगल सर्च इंजिन जेवढं सर्चिंगसाठी प्रसिद्ध आहे, तितकंच आपल्या क्रिएटिव्ह कल्पनांबद्दलसुद्धा. त्या त्या दिवसांचे दिनविशेष गुगल सर्च करणाऱ्यांना वेगवेगळ्या आकर्षक पद्धतीने माहित करून द्यावेत, यासाठी गुगलचं गुगल डुडल नेहमीच संकल्पना घेऊन येत असतं.

 

आज जर गुगलवर पहाल तर चक्क गुगल झिप चेनने उघडावं लागतंय असं दिसेल. ही अद्भुत कल्पना आज गुगलवर मांडली जात आहे, कारण आज झिप चेनचा शोध लावणाऱ्या गिडिओन संडबॅक यांची जयंती आहे. झिप चेनच्या जनकाला गुगल डुडलने दिलेली ही आगळी वेगळी आदरांजली आहे.

 

गिडिओन संडबॅक हे स्वीडीश अमेरिकन होते. त्यांचा जन्म २४ एप्रिल १८८० मध्ये झाला होता. १९०५ मध्ये अमेरिकेत गेले. तेथे त्यांनी पिटस्बर्गमधील वेस्टिंगहाऊस इलेक्ट्रिक अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कामाला सुरुवात केली. आणि तिथून पुढे ते न्यूजर्सी येथील फास्टनर कंपनीत  काम करू लागले. याच कंपनीत १९०९ साली ते प्रमुख डिझायनर बनले. साधारण १९१४ च्या सुमारास स्त्रियांच्या जोड्यांसाठी सर्वप्रथम झिप चेनचा प्रयोग केला. नाडी, बटन, हुक यासारख्या गोष्टींना झिपमुळे एक नवा पर्याय मिळाला. ही झिप चेन पुढे प्रचंड लोकप्रिय झाली. यामध्ये अनेक सुधारणा करत संडबॅक यांनी कपड्यांसाठी झिप चेन तयार केली आणि यातून वस्त्रोद्यग क्षेत्रात क्रांती घडली. पण झिप चेनला सर्वाधिक मागणी आणि लोकप्रियता लाभली ती दुसऱ्या महायुद्धाच्या काळात. त्यानंतर झिपचा वापर वाढतच गेला आणि आज झिप ही केवळ फॅशन न राहता सर्वात उपयोगी वस्तू बनली आहे.

 

[jwplayer mediaid="88912"]