मनसेने घातला राडा, मराठीतच परीक्षा घ्या...

आयटीआयटी इंग्रजी भाषेत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विरोध केला आहे. या अभ्यासक्रमाचं शिक्षण मराठी भाषेत दिलं जातं. मात्र परीक्षा इंग्रजीत घेतल्या जातात.

Updated: Jun 28, 2012, 05:57 PM IST

www.24taas.com, कोल्हापूर

 

आयटीआयटी इंग्रजी भाषेत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विरोध केला आहे. या अभ्यासक्रमाचं शिक्षण मराठी भाषेत दिलं जातं. मात्र परीक्षा इंग्रजीत घेतल्या जातात. त्यामुळे कोल्हापुरात मनसेनं आज रेल रोको आंदोलन केलं.

 

मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी शाहू महाराज टर्मिनसवर हरिप्रिया एक्स्प्रेस काही काळ रोखून धरली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून ही परीक्षा मराठीत घेण्याची मागणी केली.

 

मराठीच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमीच आक्रमक राहिले आहेत. मराठी पाट्या, मराठी शाळा, आणि आता मराठी अभ्यासक्रमाच्या परीक्षा यावर मनसेने आवाज उठविला आहे. त्यामुळे मनसेला यात कितपत यश मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.