www.24taas.com, बारामती
बीडमधल्या परळीत स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणांतला आरोपी सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी 26 दिवस फरार राहणं हे राज्य सरकारचं अपयश असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय....
सुप्रिया सुळे यांचीही टीका म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा आहेरचं मिळाला आहे, गृहखातं राष्ट्रवादीकडे असतानाही सुप्रिया सुळेंच्या या टीकेबाबत राजकीय वर्तुळात कुजबुज सुरु झालीय.
.
दरम्यान परळीतील बेकायदेशीर गर्भपात आणि गर्भलिंगनिदान प्रकरणी फरार झालेला डॉ. सुदाम मुंडे अखेर पोलिसांना नुकताच शरण आलाय. मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे यांनी परळीतल्या पोलीस स्टेशनसमोर हजेरी लावली. पोलिसांना चकवा देत मुंडे पती-पत्नीने २६ दिवसांत तब्बल पाच राज्य पालथी घातली.
स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणी जळगावातल्या डॉक्टर कोल्हेला पोलिसांनी अटक केलीय. डॉक्टर कोल्हेचं बीड कनेक्शन म्हणजे डॉक्टर सुदाम मुंडेशी कनेक्शन असल्याच पोलीस तपासात उघड झालंय. क्रुरकर्मा डॉक्टर सुदाम मुंडेच्या सांगण्यावरून कोल्हेने ५५ गर्भलिंगनीदान केल्याचं पोलीस तपासात उघड झाले. कोल्हेला २५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. कोल्हेला अटक होताचं जळगाव आयएमएने त्यांचा निषेध करत त्यांचं आयएमचं सदस्यत्व रद्द केलीय. त्याची माहिती राज्य व राष्ट्रीय कार्यकारणीला पाठविण्यात आलीय. तसेच गर्भलिंगनिदान चाचणीची माहिती विचारण्यास आलेल्या रुग्णांची माहिती राज्य शासनास आयएमएकडून देण्यात येणार आहे.
परळीतील बेकायदेशीर गर्भपात आणि गर्भलिंगनिदान प्रकरणी फरार झालेला डॉ. सुदाम मुंडे अखेर पोलिसांना शरण आलाय. मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे यांनी परळीतल्या पोलीस स्टेशनसमोर हजेरी लावली. पोलिसांना चकवा देत मुंडे पती-पत्नीने तब्बल पाच राज्य पालथी घातली. बोलेरो गाडी घेऊन मुंडे पती-पत्नी आणि गाडीचा चालक परमेश्वर अंकुशे तसंच परळीतल्या अष्टविनायक मेडिकलचा चालक संजय सोनी असे चौघेही जण थेट मध्य प्रदेशात पोचले. त्यानंतर पोलीस मागे आणि मुंडे पुढे असा पाठलाग सुरू झाला.
२६ दिवसांत मुंडे पती-पत्नीने मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, उत्तरप्रदेशातल्या अनेक गावांमध्ये वास्तव्य केलं. अखेर पोलिसांनी मुंडेच्या बॅंक खात्यांची नाकाबंदी केल्याने मुंडेला पोलिसांपुढे शरण यावं लागलं. मुंडेला आज परळी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
.
[jwplayer mediaid="123718"]