लिफ्टमध्ये अडकून महिला रुग्णाचा मृत्यू

कोल्हापुरच्या छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलमध्ये लिफ्टच्या दरवाजात अडकून एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. वंदना गालंडे असं या महिलेचं नाव आहे.

Updated: Dec 6, 2011, 08:20 AM IST

झी २४ तास वेब टीम, कोल्हापूर

 

कोल्हापुरच्या छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलमध्ये लिफ्टच्या दरवाजात अडकून एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. वंदना गालंडे असं या महिलेचं नाव आहे. ह्रदयरोगावर उपचार घेण्यासाठी २९ नोव्हेंबरला ती सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. उपचारासाठी तिला कार्डियाक विभागात नेत असताना, हा प्रकार घडला. लिफ्ट सकाळपासूनच बंद होती, मात्र या स्वरुपाचा कोणताही बोर्ड याठिकाणी लावलेला नव्हता.

 

उपचारासाठी या महिलेला नेत असताना वॉर्डब़ॉय आणि नातेवाईकांनी तिचं स्ट्रेचर लिफ्टमध्ये ठेवलं. पण अचानक लिफ्ट सुरु झाल्यानं हा अपघात घडला. यात एक वॉर्डबॉयही जखमी झालाय. या अपघाताच्या चौकशीचे आदेश सीपीआर प्रशासनानं दिलेत.