'झी २४ तास'चा दणका, गावकऱ्यांना पाणीपुरवठा सुरू

सांगलीमधल्या तिकोंडा ग्रामस्थांचा सत्ताधाऱ्यांनी पाणीपुरवठा बंद करून अडवणूक केली होती. मात्र 'झी २४ तास'नं या प्रश्नाला वाचा फोडताच गावकऱ्यांचा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.

Updated: Feb 29, 2012, 01:16 PM IST

www.24taas.com, सांगली

 

सांगलीमधल्या तिकोंडी ग्रामस्थांचा सत्ताधाऱ्यांनी पाणीपुरवठा बंद करून अडवणूक केली होती. मात्र 'झी २४ तास'नं या प्रश्नाला वाचा फोडताच गावकऱ्यांचा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.

 

सांगलीतल्या तिकोंडी गावात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला अधिक मतदान झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी ग्रामस्थांवर अघोषित बहिष्कार टाकला. आणि टॅन्करनं होणारा पाणीपुरवठा बंद करून अडवणूक सुरू केली होती. मतदान केलेल्याच काही परिसरातल्या  ग्रामस्थांचाच फक्त पाणीपुरवठा बंद केला. त्यामुळे पाण्यावाचून आठ दिवस ग्रामस्थांना प्रचंड हाल सहन करावे लागले.

 

'झी २४ तास'नं या प्रश्नाचा पाठपुरावा केल्यानंतर तिकोंडी गावातल्या ग्रामस्थांचा पाणीपुरवठा आता सुरळीत करण्यात आला आहे. जनतेचे सेवक असलेल्यांनीच आकस मनात धरून जनतेची अडवणूक केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे.

 

संबंधित बातम्या

 

राष्ट्रवादीने केली तिकोंडी गावाची कोंडी