कोअर कमिटीत बदलाचे अण्णांचे संकेत

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लवकरच कोअर कमिटीची पुनर्रचना करणार असल्याचे संकेत दिले आहेत. जनलोकपाल विधेयकासाठी स्थापन करण्यात आलेली कोअर कमिटी फक्त अडीच महिन्यांसाठी होती, असे सांगून त्यांनी त्यात बदल अपेक्षीत असल्याचं म्हटलं आहे.

Updated: Nov 7, 2011, 10:32 AM IST

झी २४ तास वेब टीम, राळेगणसिद्धी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लवकरच कोअर कमिटीची पुनर्रचना करणार असल्याचे संकेत दिले आहेत. जनलोकपाल विधेयकासाठी स्थापन करण्यात आलेली कोअर कमिटी फक्त अडीच महिन्यांसाठी होती, असे सांगून त्यांनी त्यात बदल अपेक्षीत असल्याचं म्हटलं आहे.

इंडिया अगेस्ट करप्शनच्या आंदोलनाला आणखी मजबूत करण्यासाठी कोअर कमिटीमध्ये समाजातील सर्व घटकांना योग्य प्रतिनिधीत्त्व देणं गरजेचं असल्याचं अण्णांनी सांगितलं. आम्ही निर्णय घेतला आहे की, या कमिटीमध्ये अल्पसंख्यांक आणि युवकांनाही सामील केलं जाणार आहे.

कोअर कमिटी अडीच महिन्यांसाठी होती, असं वक्तव्य केल्यानंतर कमिटी लवकरच बरखास्त होणार असल्याचे संकेत अण्णांनी दिले आहेत.

याआधी अण्णा लवकरच कोअर कमिटीची पुनर्रचना करणार असल्याचा दावा अण्णांचा ब्लॉग लिहिणारे राजू परुळेकर यांनी एका पत्राद्वारे केला होता. मात्र कोअर कमिटी बरखास्त होणारच नसल्याचं अण्णांनी तीन दिवसांपूर्वी दिल्लीत सांगितलं होतं. त्यामुळे आता अण्णाच तीन दिवसांपूर्वी केलेल्या वक्त्यापासून माघार घेत आहेत.