वनमंत्र्याच्या मतदारसंघात बोगस मतदारांचं रान !

राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे बोगस मतदार शोधून काढलेत. या प्रकरणाची प्रशासनाकडून चौकशी सुरु झाली आहे.

Updated: Nov 7, 2011, 08:54 AM IST

झी २४ तास वेब टीम, सांगली

राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे बोगस मतदार शोधून काढलेत. या प्रकरणाची प्रशासनाकडून चौकशी सुरु झाली आहे. सांगली जिल्ह्यातील कुंडल आणि पलूसमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांच्या मतदारसंघात कुंडल आणि पलूस भाग येतात. काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्य़कर्त्यांनी या बोगस मतदार नोंदणीचा पर्दाफाश केला आहे. जवळपास शंभरहून अधिक बोगस मतदार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शोधून काढलेत.

 

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पतंगराव समर्थकांकडून बोगस मतदार नोंदणी केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर तहसील प्रशासनानं चौकशीचे आदेश दिलेत. तर तलाठ्याविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीये. मात्र या बोगस मतदार नोंदणीच्या सूत्रधार शोधून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.