प्रश्न बाईक्सच्या सुरक्षेचा !

काही चाकरमानी विश्वासाने आपापल्या गाड्या पार्किंगमध्ये ठेऊन ऑफिसला जातात. पार्किंगमध्ये बाईकच्या रखवालीसाठी मुलं असतात. तरीही बाईक चोरी होत असतील तर आपल्या गाड्या कुठे सुरक्षित राहतील असा प्रश्न सामान्यांना पडलाय.

Updated: Dec 6, 2011, 03:14 AM IST

झी २४ तास वेब टीम, ठाणे

 

काही चाकरमानी विश्वासाने आपापल्या गाड्या पार्किंगमध्ये ठेऊन ऑफिसला जातात. पार्किंगमध्ये बाईकच्या रखवालीसाठी मुलं असतात. पण तरीही बाईक चोरी होत असतील तर मग आपल्या गाड्या कुठे सुरक्षित राहतील असा प्रश्न सामान्यांना पडलाय. सीसीटीव्हीमधील फुटेज पाहिल्यावर कुणालाही वाटेल की या मुलाची बाईक कदाचित बिघडलीय त्यामुळे तो बाईक ढकलत नेत आहे. पण प्रत्यक्षात तो दिवसाढवळ्या बाईक चोरून नेत असतो.

 

भाईंदर रेल्वेस्टेशनजवळच्या पार्किंगमध्ये रमेश वाडकर रोज बाईक ठेऊन ऑफिसला जात. पण २ डिसेंबरला ते ऑफिसमधून परतले तेव्हा पार्किंगमध्ये त्यांची बाईक नव्हती. त्यावर सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुमची बाईक दिसते का ते पहा असा फुकटचा सल्ला पार्किंगमधल्या सुरक्षारक्षकांनी दिला. वाडकरांची बाईक या चोरानं अत्यंत शिताफीनं पळवलीय.  याबाबत आरपीएफनं वाडकरांची तक्रार दाखल करून घ्यायला नकार दिला. नवघर माणिकपूर पोलिसांना खडसावल्यानंतर मात्र आरपीएफला तक्रार दाखल करण्यावाचून गत्यंतर नव्हतं.

 

आम्ही इथेचं असतो त्यामुळं बाईकला हँडल लॉक करायची गरज नाही असं या पार्किंगमधले सुरक्षारक्षक सांगतात. त्यामुळं बाईक पळवायला चोरांना मदतच होते. पण हा सगळा प्रकार पाहता, पार्किंगमधल्या सुरक्षारक्षकांची आणि पोलिसांची भूमिका संशयास्पदच वाटते.