माळींची काळी संपत्ती

डोंबिवलीतून लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक सी.एस.माळीकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचं उघड झालयं. दोन दिवसांच्या तपासात त्याच्याकडे दोन कोटींची संपत्ती असल्याचं उघड झालयं. माळीकडे अजूनही मालमत्ता असण्याची शक्यता आहे.

Updated: Dec 5, 2011, 02:55 PM IST

झी २४ तास वेब टीम, डोंबिवली

कल्याण महापालिकेचे सहाय्यक रचनाकार सुनील जोशी यांनी कोट्यावधी रुपयांची माय जमवल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता दुसरं एक प्रकरण डोंबिवलीत उघडकीस आलं आहे. गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढणाऱ्या कल्याण डोंबिवलीत सरकारी सेवेत असलेल्यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कशा प्रकारे न संपत्ती गोळी केली आहे त्याचं आणखी एक उदाहरण.

डोंबिवलीतून लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक सी.एस.माळीकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचं उघड झालयं. दोन दिवसांच्या तपासात त्याच्याकडे दोन कोटींची संपत्ती असल्याचं उघड झालयं. माळीकडे अजूनही मालमत्ता असण्याची शक्यता आहे. बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या माळीला 60 हजार रूपयांची लाच घेतांना अटक झाली होती. आपल्या कारकिर्दीत त्यानं कोट्यवधींची माया जमवलीय. विशेष म्हणजे कल्याण, डोंबिवली आणि सोलापूर शहरात त्यानं ही संपत्ती जमवलीय. कल्याण डोंबिवलीत त्याच्या नावार चार दुकानं आणि तीन फ्लॅट्स आहेत तर सोलापुरातल्या मिलेनियम टॉवरमध्ये एक दुकान आहे. माळीच्या घरातल्या इंटेरियरची किंमत 10 लाख रूपये आहे.