टीम अण्णांनी नाकारलं सरकारचे लोकपाल विधेयक

टीम अण्णांनी सरकारने संसदेत मांडलेल्या लोकपाल विधेयकावर घणाघाती हल्ला चढवला आहे. सरकारने मांडलेले विधेयक जनतेच्या विरोधात असल्याचं अरविंद केजरीवाल म्हणाले. सरकारच्या हातातलं बाहुलं लोकपाल बनेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

Updated: Dec 22, 2011, 10:57 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

टीम अण्णांनी सरकारने संसदेत मांडलेल्या लोकपाल विधेयकावर घणाघाती हल्ला चढवला आहे. सरकारने मांडलेले विधेयक जनतेच्या विरोधात असल्याचं अरविंद केजरीवाल म्हणाले. सरकारच्या हातातलं बाहुलं लोकपाल बनेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

सरकारी अधिकाऱ्यांना हटवण्याचे अधिकार मंत्र्याकडे असल्याचं तसंच भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांना मोफत वकील देण्याची तरतुद या विधेयकात असल्याकडे केजरीवाल यांनी लक्ष वेधलं.

लोकपालला सरकारने निव्वळ पोस्ट ऑफिस बनवल्याची टीकाही त्यांनी केली. चौकशीच्या वेळेस लोकपालला हटवण्याची तरतुदही विधेयकात आहे. तसेच क आणि ड गटातील कर्मचाऱ्यांचा समावेश लोकपालच्या कक्षेत का नाही असा खडा सवालही त्यांनी विचारला. सीवीसीवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण लोकपालकडे नाही.
.
तक्रारदाराला आयुष्यभर झगडावं लागेल असंही केरजीवालांनी सांगितलं. लोकपालमध्ये राजकीय पक्षांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळेच टीम अण्णांनी सरकारने संसदेत मांडलेले लोकपाल विधेयक नाकारलं आहे. तसंच त्याविरोधात २७ डिसेंबरपासून मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याचं तसंच अण्णा हजारे उपोषणाला बसणार असल्याचं केजरीवालांनी सांगितलं.
.
[jwplayer mediaid="16909"]