भेटायला आली सलमानला, भेटला मात्र भामटा

मुंबईच्या मायानगरीत स्वप्नपुर्तीसाठी लोक येतात खरं, पण त्यांची गाठ कोणाशी पडेल याचा काही नेम नसतो. नुकताच असा अनुभव मुंबईत आपल्या लाडक्या सलमान खानला भेटायला आलेल्या किशोरवयीन चाहतीला आला.

Updated: Mar 6, 2012, 08:21 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईच्या मायानगरीत स्वप्नपुर्तीसाठी लोक येतात खरं, पण त्यांची गाठ कोणाशी पडेल याचा काही नेम नसतो. नुकताच असा अनुभव मुंबईत आपल्या लाडक्या सलमान खानला भेटायला आलेल्या किशोरवयीन चाहतीला आला.

 

सुपरस्टार सलमान खानला भेटायचं स्वप्न असलेली एक १४ वर्षीय मुलगी होशंगाबाद, मध्यप्रदेशातून आली होती. ही मुलगी घरातून पळून आली होती आणि येताना घरातले ३००० रुपयेही यासाठी तिने चोरले होते. पळून जाऊन घरच्यांच्य़ा जीवाला घोर लावला तो निराळाच.

 

अर्थातच, मुंबई काय चिज आहे हे लक्षात येईपर्यंत ही नववीत शिकणारी सलमान भक्त आपल्याकडील ३००० रुपये गमावून बसली होती. ना तिच्याकडे घरी जाण्यासाठी पैसे होते ना पोटाचं खळगं भरण्यासाठी. तुझी सलमानशी भेट घडवून देतो असं सांगत एका अज्ञात इसमाने या मुलीला हातोहात गंडवलं होतं. आणि तिच्याकडील सर्व पैसे घेऊन पसार झाला होता.

 

दरम्यान या मुलीच्या वडलांनी आपली मुलगी हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांनीही दक्ष राहून मुलीचा शोध घेतला, तेव्हा रेल्वे पोलिसांना कुर्ला स्टेशनच्या आरामखोलीत ही मुलगी आढळली. आता पोलीस या मुलीला सलमानच्या भेटीचं आमिष दाखवून फसवणाऱ्या भामट्याचा शेध घेत आहेत.

 

आपल्या चाहतीचं वेड प्रेम बघून सलमान काय बोलणार?