www.24taas.com, मुंबई
रिअल्टी शो बिग बॉसमधून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेल्या वीणा मलिकने एका मासिकाच्या मुखपुष्ठासाठी न्यूड फोटोशूट करत वादंगही माजवला होता. पण वीणा मलिकने सिनेमात कपडे उतरवण्याबाबत आपली कोणतीही हरकत नसल्याचं दाखवून दिलं आहे. राजीव रुईच्या जिंदगी 50:50 या सिनेमासाठी वीणाने एक पाऊल पुढे टाकत बोल्ड सीन्स दिले आहेत. या सिनेमात वीणा एका वेश्येची भूमिका साकारत आहे आणि काही न्यूड सीन्स तिने शूट करुन दिले आहेत.
वीणाने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत राजीवने मला ऑफर दिली होती आणि त्याला मी ही भूमिका चांगल्या प्रकारे साकारेन अशी खात्री होती. बाईगं कापडं फेडण्याबाबत तुला कोणाची स्पर्धा असू शकते का? माझी भूमिका नकारात्मक असली तरी ती क्युट आहे असं वीणाचं म्हणणं आहे. माझी आदर्श भूमिका नकारात्मक, सशक्त आणि चांगल्या अभिनयाला वाव असणारी असावी इती वीणा....आता न्यूड सीन बाबतीत वीणाचे म्हणणं आहे की कोणत्याही सिनेमासाठी तिने कपडे उतरवलेले नाहीत. तसंच या सिनेमातही तशी दृष्यं नाहीत फक्त काही बोल्ड सीन्स आहेत आणि तेही अतिशय कलात्मकदृष्ट्या शूट करण्यात आले आहेत.
वीणाने एका मासिकासाठी न्यूड फोटो शूट केलं होतं आणि दंडावर पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयचा टॅटू काढला होता. वीणाचे फोटा प्रसिद्ध होताच पाकिस्तानात एकच वादंग माजला आणि तिच्या विरुद्ध कट्टरपथियांनी फतवाही जारी करण्यात आला होता. आता या आगामी सिनेमात वीणाने रिया सेनसोबत आयटम नंबरही परफॉर्म केला आहे. एकेकाळी रिया सेन आणि आश्मित पटेल यांच्यात खास संबंध होते. आता वीणाने अश्मितशी सूत जूळवलं आहे. असो वीणाच्या या सिनेमाची अनेकांना प्रतिक्षा असेल.