Viral Video: संतापजनक! LIVE व्हिडिओ करताना कोरियन महिलेचा मुंबईत विनयभंग

Viral Video : भारतीयांची मान शरमेने खाली घालणारी घटना मुंबईतील खार परिसरात घडली आहे. 

Updated: Dec 1, 2022, 12:44 PM IST
Viral Video: संतापजनक! LIVE व्हिडिओ करताना कोरियन महिलेचा मुंबईत विनयभंग title=
youtuber Korean women molested during Live Video in Khar Mumbai nmp

Viral Video : मुंबईतील (Mumbai) खार परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका कोरियन यूट्यूबरचा (Korean woman YouTuber harassed on Mumbai street ) लाईव्हस्ट्रीमिंगदरम्यान दोन तरुणांनी विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कोरियन युवती खार परिसरात लाईव्ह स्ट्रीमिंग करत होती. त्यावेळी दोन तरुणांनी तिचा विनयभंग केला. या सर्व प्रकारानंतर खार पोलिसांनी सुमोटा गुन्हा दाखल करत, दोन आरोपींना बेड्या ठोकल्या. 

Live Video दरम्यान धक्कादायक प्रकार 

या व्हिडिओमध्ये महिला युट्युबर असून ती एका तरुणाला प्रश्न विचारत होती. त्यावेळी तिथे दोन तरुण आले आणि त्यांनी महिलेसोबत अश्लिश चाळे करण्यास सुरुवात केली. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ते तिच्यासोबत जबरदस्ती करताना दिसतं आहेत. या कोरियन महिलेला हे नराधम आपल्या बाईकवर बसून घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत असताना दिसतं आहे. 

ही युट्युबर महिला व्हिडिओ करत असताना हा प्रकार घडल्यामुळे या नराधमांचं कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं. पोलिसांनी आरोपींना लगचेच पडकलं आहे. मोबीन चांद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सदरेआलम अन्सारी अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. काही दिवसांपूर्वी अंधेरीतही एका युकेतून आलेल्या महिलेसोबतही धक्कादायक घटना घडली होती. त्या महिलेसोबत तर कार चालकाने हस्तमैथुन केलं होतं. याप्रकरणातही कारचालकाला अटक झाली होती. 

संतापजनक व्हिडिओ

मुंबईत महिला सुरक्षेत आहे का असा प्रश्न आपण वारंवार विचारतो. त्याच आता परदेशी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे.