Crime : शरीरावर 32 वार आणि 500 टाके; चोर समजून ज्याला भिडला तो बायकोचा बॉयफ्रेंड निघाला

चोर समजून ज्याला भिडला तो बायकोचा बॉयफ्रेंड निघाला (extramarital affair). उल्हासनगरमधील (Ulhasnagar ) एका व्यक्तीला हा धक्कादायक अनुभव आला आहे (Crime News) .  

Updated: Jan 14, 2023, 04:06 PM IST
Crime : शरीरावर 32 वार आणि 500 टाके; चोर समजून ज्याला भिडला तो बायकोचा बॉयफ्रेंड निघाला  title=

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर :  घरात चोर शिरल्याचे समजून एक व्यक्तीने बचाव करण्याचा प्रयत्न केला. चोराने त्याच्यावर हल्ला केला. 32 वार झाल्याने या व्यक्तीला 500 टाके पडले आहेत. मात्र, चोर समजून ज्याला भिडला तो बायकोचा बॉयफ्रेंड निघाला (extramarital affair). उल्हासनगरमधील (Ulhasnagar ) एका व्यक्तीला हा धक्कादायक अनुभव आला आहे (Crime News) .  

बंटी वाधवानी असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. बंटी हा उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प  रस्त्यावरील गुरू गोविंद पॅलेस इमारतीत  पत्नी मुलांसोबत राहतो. ५ जानेवारीच्या दिवशी बंटी वाधवानी हे त्यांच्या पत्नीला राधास्वामी सत्संगला सोडण्यासाठी मोटारसायकल वरून बाहेर गेले.

काही मिनिटात बंटी हे पुन्हा घरी आले असता अचानक त्यांच्या घरात वेषांतर करून एक इसम लपून बसल्याचे निदर्शनास आले. बंटी यांनी चोर चोर ओरडायला सुरूवात केली आणि त्याच क्षणी बंटी यांच्यावर ह्या चोराने चाकू ने जीवघेणा हल्ला केला.
या हल्ल्यात बंटी वाधवानी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. आरडा ओरडा ऐकून शेजारी त्याच्या मदतीला धावून आले.  इमारती मधील नागरिकांनी तात्काळ विठ्ठलवाडी पोलिसांना फोन करून माहिती दिली आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून हल्लेखोराला अटक केली.

आता ह्या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. अटक केलल्या व्यक्तीचे नाव महेश थारवानी  असे आहे. महेश हा बंटीच्या पत्नीचा प्रियकर असल्याचा खुलासा बंटीने केला आहे . सासू आणि बायकोने मिळून आपल्याला संपवण्याचा कट रचल्याचा आरोप बंटी याने केला आहे.  

सद्या बंटीची प्रकृती स्थिर असून उल्हासनगर मधील खाजगी रुग्णालयात  त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बंटीच्या शरीरावर तब्बल  पेक्षा अधिक टाके आहेत. महेशने बंटीवर तब्बल 32 वार केले आहेत. विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपी महेश थारवानी याला बेड्या ठोकल्या आहेत.

पत्नी आणि सासू चा ह्या गुन्ह्यात सहभाग असेल तर नक्की त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी सांगितले. या घटनेमुळे उल्हासनदर शहरात एकच खबबळ उडाली आहे.