Rain Update | पुढचे 3 दिवस पावसाचे, पाहा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट, पाहा तुमचा जिल्हा आहे का?

Updated: Jul 11, 2022, 03:34 PM IST
Rain Update | पुढचे 3 दिवस पावसाचे, पाहा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज title=

मुंबई : मुंबईसह उपनगरात पावसाची रिमझिम सुरू आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये पावसाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी पाणीसाचलं आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा अलर्ट दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात ऑरेंज अलर्ट दिला आहे. 

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसोबत पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर तीन जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पुढचे 24 तास अति मुसळधार तर 12 एप्रिल रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात पुढच्या 24 तासात रिमझिम पाऊस असेल. 

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढचे 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.