बंडखोर आमदाराची पदावरुन हकालट्टी, आमदाराचं थेट उद्धव ठाकरेंच्या आदेशाला चॅलेंज

आधी ढसाढसा रडले नंतर 24 तासातच गेले शिंदे गटात, आता पक्षाकडून कारवाई

Updated: Jul 11, 2022, 02:06 PM IST
बंडखोर आमदाराची पदावरुन हकालट्टी, आमदाराचं थेट उद्धव ठाकरेंच्या आदेशाला चॅलेंज title=

Maharashtra Politics : हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर (Santosh Banger) हे अनेक नाट्यमय घडामोडी करून बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात गेले. पक्षविरोधात कारवाई केल्यानं आता बांगरांची हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

आमदार संतोष बांगर पक्षाशी बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले होते. त्यानंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी संतोष बांगर यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. त्यानतंर पक्षाकडून कारवाई करत संतोष बांगर यांना शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरुन हटवण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला चॅलेंज
दरम्यान, संतोष बांगर यांनी थेट आदेशालाच चॅलेंज दिलं आहे. मी अजूनही शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे, असं संतोष बांगर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याने एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं, मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकनिष्ठ शिवसैनिक असल्याचंही बांगर यांनी म्हटलं आहे. 

आधी रडले आण मग फुटले
एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आमदार संतोष बांगर आक्रमक झाले होते. बंडखोर आमदारांविरोधात त्यांनी आंदोलनही केलं.

इतकंच नाही तर त्यावेळी मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहेत म्हणत संतोष बांगर ढसाढसा रडले होते, पण यानंतर अवघ्या 24 तासाच बांगर शिंदे गटात सहभागी झाले होते.