मुंबईतील आकाशवाणी आणि विस्तारित आमदार निवासात अभ्यांगतांना प्रवेश बंदी

आकाशवाणी आणि विस्तारित आमदार निवासात प्रवेश बंदी

Updated: Apr 1, 2021, 10:27 PM IST
मुंबईतील आकाशवाणी आणि विस्तारित आमदार निवासात अभ्यांगतांना प्रवेश बंदी title=

मुंबई : मुंबईतील आकाशवाणी आणि विस्तारित आमदार निवासात अभ्यांगतांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पुढील सूचना येईपर्यंत कार्यकर्ते, अभ्यागत यांच्यासाठी प्रवेश बंदी असणार आहे. आमदार निवासात करोना रुग्ण आढळल्याने प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. विधिमंडळ सचिवांनी आमदार निवास व्यवस्थापनाला याबाबत पत्र दिले असून सर्व आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईत आज 8 हजार 646 रुग्णांची वाढ झाली असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईतील आकाशवाणी आणि आमदारा निवासात राज्यभरातून लोकं येत असतात. येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यातच आता कोरोनाचा रुग्ण आढळल्याने प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यात आज पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली आहे. राज्यात कोरोनाचा कहर काही थांबताना दिसत नाहीये. गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 43 हजार 183 रुग्णांची वाढ झाली आहे. 

देशात महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे. जेथे कोरोना रुग्णांची संख्या ही अधिक झपाट्याने वाढत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गाचा वेग हा अधिक आहे. राज्यात गेल्या 24 तासात 249 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.