Urfi Javed Latest News : मॉडेल उर्फी जावेदच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्तांनी उर्फी जावेद (Urfi Javed) हिच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. (Mumbai Police Notice to Urfi Javed Inquiry ) सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी उर्फीविरोधात चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी तक्रार केली होती. (Urfi Javed vs Chitra Wagh) या तक्रारीची दखल मुंबई पोलिसांनी घेतली आहे. (Mumbai News) अंबोली पोलीस ठाण्यात आज उर्फी जावेदची चौकशी होणार आहे. तिला आजच चौकशीला हजर राहण्याची नोटीस जारी करण्यात आली आली आहे. उर्फीची चौकशी करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Latest Mumbai News Today)
भाजप नेत्या चित्रा किशोर वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed ) यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर याची दखल घेत मुंबई पोलिसांनी उर्फीला चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे उर्फीवर कारवाई होणार असे संकेत मिळत आहेत. दरम्यान, सातत्याने चित्रा वाघ यांना डिवचणाऱ्या उर्फी हिने आता महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद हिला हानी पोहोचवण्यासाठी धमकावणे आणि गुन्हेगारी धमकी दिल्याबद्दल चित्रा वाघ यांच्याविरोधात आता उर्फीच्या वकीलांनी तक्रार दाखल केली आहे. (Mumbai News Today)
मॉडेल उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी टीका केली होती. जिथे सापडेल तिथे उर्फीला थोबडवण्याचा इशारा चित्रा वाघ यांनी दिला होता. इतकंच नाही तर भर रस्त्यावर अतरंगी कपडे घालून फिरणाऱ्या ऊर्फी जावेदविरोधात चित्रा वाघांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे (Mumbai Police Commissioner) तक्रार नोंदवून अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी उर्फीविरोधात आता कारवाई करण्यासाठी पावले उचल्याचे दिसून येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तिला चौकशीची नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यामुळे उर्फी हिच्या अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे.
चित्रा किशोर वाघ यांनी उर्फी जावेदविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन तक्रार दिली आणि कारवाईची मागणी केली. चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन Urfi उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. कमी कपड्यात मुंबईच्या रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या उर्फी जावेदवर त्वरीत कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी मुंबई पोलिसांकडे त्यांनी केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी उर्फीचा व्हिडिओ शेअर करत ट्विटरवर पोलिसांकडे तक्रार केली होती. आता त्यांनी स्वतः पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. उर्फीच्या अटकेची मागणीही त्यांनी केली आहे.