Mumbai Latest News : मुंबईत आता एकाच तिकिटावर सार्वजनिक ठिकाणी प्रवास करता येणार आहे. (Mumbai News) मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बेस्ट प्रवास आता एकाच तिकीटात करता येणार आहे. एमएमआरडीएची एकात्मिक प्रणाली सुविधा 19 जानेवारीपासून सेवेत येत आहे. भविष्यात हे कार्ड देशभरातल्या कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी वापरता येईल. (Mumbai News in Marathi) या सुविधेची सुरुवात गुरुवारी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. (Latest Marathi News Mumbai) मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था बळकट करतानाच प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ‘एमएमआरडीए’कडून करण्यात येत आहे.
मुंबई आणि उपनगरीय रेल्वेमध्ये एकात्मिक तिकीट प्रणालीची अंमलबजावणी आता होणार असून रेल्वे, मेट्रो, मोनो, बेस्ट आदींमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना एकाच तिकिटाचा पर्याय उपलब्ध झालाआहे. बेस्ट उपक्रमामध्ये अलिकडेच एकात्मिक तिकीट प्रणालीची प्रायोगित तत्वावर अंमलबजावणी केली होती. यासाठी प्रवाशांना कार्डाचेही वाटप करण्यात आले.मात्र, त्याला अल्प प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, रेल्वे, मेट्रो किंवा अन्य परिवहन सेवांमध्ये ही यंत्रणा उपलब्ध नव्हती. आता ही सेवा 19 जानेवारीपासून सुरु होत आहे. बेस्टनंतर आता मुंबई आणि उपनगरीय रेल्वे स्थानकातही एकाच तिकिटावर प्रवास करता येणे शक्य होणार आहे.
रेल्वे, मेट्रो, मोनो, बेस्ट आणि अन्य सार्वजनिक परिवहन उपक्रमांसाठी एकच तिकीट असावे, यासाठी एकात्मिक तिकीट प्रणालीची योजना आखण्यात आली आहे. या योजनेनुसार रेल्वे स्थानकातील सर्व प्रवेशद्वारांवर कार्ड रीडर बसविण्यात येणार येत आहेत. प्रवास करणाऱ्यांना कार्ड रीडरवर कार्ड टॅप करावे लागेल, केलेल्या प्रवासानुसार कार्डमधून पैसे वजा होतील आणि तुम्हाला तिकीट मिळेल. त्यानंतर तुम्ही एकाच तिकिटावर मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बेस्टने प्रवास करु शकता.
100 ते 2000 रुपयांचे रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या कार्डवरुन ‘ई पेमेंट’द्वारे तिकीट खरेदी करता येणार आहे. मात्र तिकीट घेतल्यानंतर एका तासात प्रवास करणे आवश्यक असणार आहे. दरम्यान, ही सुविधा तूर्तास मेट्रो 2 अ (दहिसर ते डीएन नगर) आणि ‘मेट्रो 7 (दहिसर ते गुंदवली, अंधेरी पूर्व) मार्गिकेसाठी लागू असणार आहे. लवकरच मोनो, रेल्वे आणि बेस्ट प्रवासासाठीही हे कार्ड लागू होणार आहे. त्यासाठीच्या चाचण्या सुरु आहेत.