मुंबई : नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराबाबत शिवसेनेला टोला मारला होता. पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेने चांगलाच समाचार घेतला आहे. 'सामना'त 'बडबोले लेकाचे' असा अग्रलेख लिहून पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर शालजोडीतले देण्यात आलेत.
लोकसभा निवडणुकीच्यावेळी राम मंदिर उभारण्याबाबत मुद्दा करण्यात आला होता. आता आगामी निवडणुकांपूर्वी राम मंदिराचा मुद्दा पुन्हा तापू लागला आहे. शिवसेनेने हा मुद्दा पुन्हा रेटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नाशिक दौऱ्यात मोदी यांनी हा मुद्दा न्यायालयात आहे. राम मंदिराचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्याची न्यायालयात सुनावणी सुरू असून दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकूण्याची प्रक्रिया सध्य सुरू आहे. परंतु महाजनादेश यात्रेच्या समारोपाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये उपस्थित होते. यावेळी त्यांनी राम मंरादिरावरून शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या टोला हाणला होता.
राम मंदिरच्या मुद्यावरुन भाजपने शिवसेनेचा चांगला समाचार घेतला. गेले काही दिवस काही वाचाळवीर उलटसुलट वक्तव्ये करून यामध्ये अडथळा निर्माण करत आहेत, असे थेट मोदी म्हणाले होते. परंतु शिवसेनेने आपल्या सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधला आहे. राममंदिराचा विषय न्यायालयात आहे हे खरे, पण राममंदिर या विषयावर हवे तसे बोलणारे वाचाळवीर भाजपमध्येच आहेत. त्यामुळे पंतप्रधानांची नाशकातील चिडचिड समजून घेतली पाहिजे, असे टोकले आहे.
बडबोलेपणामुळे पंतप्रधानांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर भाजप नेत्यांनी राममंदिरावर बोलणे टाळले पाहिजे. भाजपच्या नेत्यांनी पंतप्रधानांची सूचना मान्य करून तोंडास कुलुपे घातली तर राममंदिराचा निर्णय लागलाच म्हणून समजा. पंतप्रधानांचीच तशी इच्छा आहे, असे अग्रलेखात नमुद करत शिवसेनेने भाजपलाच टोला लगावला आहे.