मुंबई : पक्ष फोडून तुम्हाला माणसं चालतात, मग त्या पक्षासोबत हात मिळवला तर काय फरक पडतो. त्याच पक्षातील मोठे मोठे नेत घेत भाजपने वेगेवगळ्या राज्यात त्यांना आमदारकी, खासदारकी आणि मंत्रीपद दिले आहे. ते पण त्या विचारधारेतीलच होते ना?. तुम्ही काय गंगाजल घेऊन फिरतात की सगळीकडे? वाल्याचा वाल्मिकी करण्याची यंत्रणा आमच्याकडे नाही. खरंतर हा वाल्मिकी ऋषींचा आणि वाल्याचा देखील अपमान आहे. वाल्या प्रामाणिकपणे जदत होता. तपश्चर्या करुन तो वाल्मिकी झाला. सत्तांतर करुन नाही केलं.
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'बाळासाहेबांना अनेकांनी धक्के देण्याचा प्रयत्न करुन पाहिले. ते त्यांना जमले नाही. शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना धक्के दिले ते अजून सावरलेले नाहीत. बुद्धीबळ हा बुद्धीने खेळायचा खेळ आहे. पण चाली जर लक्षात घेतल्या तर मला नाही वाटत बुद्धीबळ खेळणं कठीण आहे.'
'शिवसेनाप्रमुखांनी कधी सत्तेचं पद स्विकारलं नाही. माझी पण इच्छा नव्हती. पण ज्यांच्यासोबत होतो. त्यांच्यासोबत राहुन मी त्या दिशेने जावू शकत नाही. वेगळी दिशा स्विकारायची असेल तर त्यापुढे नाईलाज होता.'
'मी काय धर्मांतर केलं आहे का, आपण म्हणतो तेच खरं असं आहे का? केंद्रात जी सत्ता आहे, त्यात भिन्न विचारधाराचे लोकं आहेत. नितीश कुमार, पासवान, चंद्राबाबू, मेहबुबा मुफ्ती यांची विचारधारा कुठे एक होती.'
'विचारधारा वेगवेगळ्या आहेत. वेगळी विचाराधारा पेक्षा राज्याचं आणि देशाचं हिताची विचारधारा एक आहे. मोदींवर टीका करणाऱ्यांसाठी देखील त्यांच्यासाठी जावून ते प्रचार करतात. नैतिकता आम्हाला शिकवू नका.'
आसाममध्ये नदीला आग, तीन दिवसांपासून धगधगतेय
...आता पॅन कार्ड काढणं अधिक सोप्पं
जगातील कोणत्याच बाप-लेकीसोबत असं घडू नये