गर्दीच्या वेळेस पश्चिम रेल्वे विस्कळीत

ऐन गर्दीच्या वेळेस पश्चिम रेल्वेत बिघाड झाला आहे. 

Updated: Aug 7, 2019, 07:18 PM IST
गर्दीच्या वेळेस पश्चिम रेल्वे विस्कळीत title=

मुंबई : ऐन गर्दीच्या वेळेस पश्चिम रेल्वेत बिघाड झाला आहे. महालक्ष्मी स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने ऑफिसवरून घरी निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. चर्चगेटवरून बोरीवली, विरारकडे जाणाऱ्या गाड्या विविध ठिकाणी थांबल्या आहेत. मागील 15 मिनिटापासून चर्चगेटवरून एकही गाडी सुटली नाही. विरार, बोरीवलीहून चर्चगेट येणार्‍या लोकलही विविध ठिकाणी थांबल्या आहेत. या सर्वामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. रेल्वे प्रशासनातर्फे वारंवार सूचना देण्यात येत आहेत. पण रेल्वे नक्की कधी सुरु होणार याबद्दल अद्याप काही माहिती समोर येत नाही आहे.