ट्राफीकमधून वाट काढत शिंदे कुटुंबीयांच्या घरी दाखल झाला बाप्पा

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मुंबईतल्या वांद्र्यातल्या घरी गणपतीचं आगमन झालंय. संपूर्ण शिंदे कुटुंबीय यावेळी उपस्थित असतात.

Updated: Aug 25, 2017, 01:41 PM IST
ट्राफीकमधून वाट काढत शिंदे कुटुंबीयांच्या घरी दाखल झाला बाप्पा  title=

मुंबई : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मुंबईतल्या वांद्र्यातल्या घरी गणपतीचं आगमन झालंय. संपूर्ण शिंदे कुटुंबीय यावेळी उपस्थित असतात.

वाजतगाजत गणपतीबाप्पाचं आगमन झाल्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण कुटुंब आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत शिंदे यांच्या घरच्या गणपतीची आरती करण्यात आली. 

यावेळी, खासदार प्रणिती शिंदेही कुटुंबीयांच्या आनंदात सहभागी झाल्या होत्या. गेल्या वर्षी घरचा गणपती सोलापूरच्या घरी आणला गेला होता... यंदा मुंबईच्या ट्राफीकमधून वाट काढत बाप्पा घरी आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.