सुशांत आत्महत्या : तपासासाठी मुंबईत आलेले पटना पोलीस पालिकेकडून होम क्वारंटाईन

विनय तिवारी १५ ऑगस्टपर्यंत होम क्वारंटाईन 

Updated: Aug 3, 2020, 07:51 AM IST
सुशांत आत्महत्या : तपासासाठी मुंबईत आलेले पटना पोलीस पालिकेकडून होम क्वारंटाईन title=

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेल्या पटणाचे एसपी विनय तिवारी यांना १५ ऑगस्टपर्यंत क्वारंटाईन करण्यात आलंय. त्यामुळे तिवारी यांना मुंबईतली पहीली रात्र गोरेगावच्या एसआरपीएफ कॅम्प घालवावी लागली. तिवारी यांना क्वारंटाईन केल्यानंतर बिहार पोलिसांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आमचा तपास रोखण्यासाठी एसपी विनय तिवारींना होम क्वारंटाईन नव्हे तर हाऊस अरेस्ट केल्याचे बिहार पोलिसांचे म्हणणे आहे. बिहार पोलिसांचा तपास रोखण्यासाठी हे जाणिवपूर्वक पाऊल उचलल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

बिहार डिजेपी गुप्तेश्वर पांडे यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त करणारे ट्वीट केलंय. आयपीएस अधिकृत विनय तिवारी आज पटण्याहून मुंबईत त्यांच्या कर्तव्यावर बिहार पोलिसांचे नेतृत्व करण्यासाठी मुंबईत गेले. पण पालिकेच्या अधिकाऱ्यांनी रात्री ११ वाजता त्यांना जबरदस्ती क्वारंटाईन केलंय. मागणी करुनही त्यांना आयपीएस मेस देण्यात न आल्याचेही पांडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. 

विनय तिवारी यांना अधिकाऱ्यांच्या मेसमध्ये राहायचे आहे. यासाठी ते वांद्रेचे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्याशी बोलले होते. डीसीपी ९ मधील आयजी हेडक्वार्टरशी त्यांच्या संपर्क करुन देण्यात आला होता. त्यांना राहण्यासाठी रुम देण्यात आली होती. पण त्यानंतर आयजी हेजक्वार्टरने त्यांचे फोन उचलले नाहीत. 

कोरोनामुळे ऑफिसर्स मेस कार्यरत नाहीय. तिथे आधीच एक कोरोना रुग्ण आढळलाय. म्हणून एसपी विनय तिवारींना एसआरपीएफ गेस्ट हाऊसमध्ये थांबविल्याची माहिती सुत्रांकडून कळतेय. पालिकेच्या सुत्रांनुसार विनय तिवारींना १५ ऑगस्टपर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आलंय.

'फाईल चुकून डिलीट झाली'

मंगळवारी रात्री सुशांतच्या वडिलांनी रिया विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांकडून याप्रकरणी कसून चौकशी करण्यात येत आहे. बिहार पोलिसांनी आता त्यांच्या चौकशीचा मोर्चा सुशांतची एक्स-मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्येच्या दिशेकडे वळवला आहे. त्यासाठी बिहार पोलीस मालवणी पोलीस ठाण्यात तिच्या मृत्यूच्या फाईल संदर्भात माहिती घेण्यासाठी पोहोचले. 

मात्र, दिशा सालियनशी संबंधित फोल्डर डिलीट झाल्याचं सांगण्यात आलं. दिशाच्या आत्महत्येशी संबंधित फोल्डर चुकून डिलीट झाला असून तो पुन्हा मिळवणं अशक्य असल्याचं बिहार पोलिसांना सांगण्यात आलं. 

शिवाय पोलीस याप्रकरणातील सर्व माहिती सांगण्यासाठी तयार होते. बिहार पोलिसांनी फोल्डर पुन्हा मिळवण्यासाठी मदतही केली. पण त्यांना लॅपटॉप देण्यास नकार देण्यात आला. दरम्यान, सुशांत आणि दिशा सालियनच्या मृत्यूशी काही संबंध आहे का? या दृष्टीने बिहार पोलीस सध्या तपास करत आहेत.