महिला पोलीस अधिकाऱ्याशी पोलीस आणि रिक्षावाले असे वागले

मुंबईत पोलीस उपअधीक्षक सुजाता पाटील यांना इच्छित स्थळी नेण्यास रिक्षाचालकाने नकार दिला होता.

Jaywant Patil Updated: Mar 26, 2018, 04:30 PM IST

मुंबई : मुंबईत पोलीस उपअधीक्षक सुजाता पाटील यांना इच्छित स्थळी नेण्यास रिक्षाचालकाने नकार दिला होता. आता या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांनी दिलेत. दोषी अधिका-यांची चौकशी करण्यासाठी पोलीस उपायुक्त दहिया यांनी सांताक्रूझ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस आयुक्त दत्तात्रय भरगुडे यांची नेमणूक केलीय. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आलंय. सुजाता पाटील यांना अंधेरीत रिक्षाचालकांनी इच्छित स्थळी जायला नकार दिला.

स्वतःची ओळख उघड न करता

सुजाता पाटील यांनी त्यानंतर स्वतःची ओळख उघड न करता जवळच्या पोलीस स्थानकात मदत मागितली. तेव्हा पोलिसांनीही त्यांना रिक्षा पकडून देण्यासंदर्भात मदत दिली नाही. उलट उद्दामपणे वागले, असा आरोप सुजाता पाटील यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी फेसबुकवरही एक पोस्ट लिहिली आहे.