अफवेने मुंबईत चेंगराचेंगरी, जीव धोक्यात घालून लोकांच्या उड्या

मुंबईत ऑफिसला जाणाऱ्यांची तुफान गर्दी. यामुळे एलफिन्स्टन स्टेशन रेल्वे पुलावर गर्दीने रेटारेटी झाली. त्यातच कोणतही पूल कोसळ्याची अफवा पसरवली आणि एकच गोंधळ उडाळा.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 29, 2017, 12:22 PM IST
अफवेने मुंबईत चेंगराचेंगरी, जीव धोक्यात घालून लोकांच्या उड्या title=

मुंबई : आज सकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यातच ऑफिसला जाणाऱ्यांची तुफान गर्दी. यामुळे एलफिन्स्टन स्टेशन रेल्वे पुलावर गर्दीने रेटारेटी झाली. त्यातच कोणतही पूल कोसळ्याची अफवा पसरवली आणि एकच गोंधळ उडाळा. त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीने १५ जणांचा जीव घेतला. तर ३० जण यात जखमी झाली.

परळ-एलफिन्स्टन येथील स्टेशनवरील पूल अत्यंत अरुंद आहेत. त्यामुळे थोडी जरी गर्दी झाली तरी चालणं अवघड होते. पावसामुळे सकाळच्यावेळी झालेली गर्दी आणि ही गर्दी वाढत गेल्याने पुलावर चेंगराचेंगरी झाली. गर्दीच्यावेळी मोठी अफवा पसरल्याने धावपळ उडाळी. पोलीस असूनही गर्दीवर नियंत्रण आणू शकले नाहीत. त्यामुळे आपला जीव वाचविण्यासाठी अनेक जण पुलाचा आधार घेत मिळेल त्या मार्गाने लोक पुलावरुन खाली उतरण्याचा प्रयत्न करत होते. जीवाची परवा न करता जीव धोक्यात घालून लोक स्टेशन बाहेर पडत होते.

दरम्यान, मध्य रेल्वेचे परळ स्टेशन आणि पश्चिम रेल्वेचे एलफिन्स्टन स्टेशन यांना जोडणाऱ्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत १५ प्रवासी ठार, तर ३० जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. सकाळी हा पूल गर्दीनं खच्चून भरलेला असताना पुलाचा एक भाग कोसळत असल्याची अफवा पसरली आणि एकच घबराट पसरली. त्यातूनच ही चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Stampede at a Mumbai railway station, 15 dead, over 30 injured