मुंबई : पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेवरही पहिल्यावहिल्या वातानुकूलित लोकलचे वारे घुमत आहेत. येत्या वर्षात मुंबईत १२ एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्यातील सहा लोकल मध्य, तर सहा लोकल पश्चिम रेल्वेला देण्यात येणार आहेत. मात्र ही सेवा मध्य रेल्वेच्या नेमक्या कोणत्या मार्गावर चालवायची याबाबत आढावा घेण्याचे काम सुरू आहे.
मुंबईकरांसाठी नवीन वर्षाची भेट, दुसरी आरामदायी एसी लोकल
हार्बर, ट्रान्सहार्बर की मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर एसी लोकल चालवायची याविषयी खलबते सुरू आहेत. पश्चिम रेल्वेवर २५ डिसेंबर २०१७ रोजी एसी लोकल सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे गेली अनेक दशके पश्चिम रेल्वेवरुन दोन राजधानी एक्स्प्रेस दिल्लीला जात आहेत. मात्र आता मध्य रेल्वेवरुन राजधानी सुटणार आहे. राजधानी एक्स्प्रेस सीएसएमटीहून सुटेल आणि कल्याण, नाशिक, जळगाव, खांडवा, भोपाळ, झांसी,आग्रा आणि हजरत निझामुद्दीन या मार्गे जाईल. पहिल्यांदाच गुजरात ऐवजी मध्य प्रदेशमार्गे राजधानी धावणार आहे. यानिमित्ताने अनेक वर्षांपासून असलेली मागणी पूर्ण झाली आहे.