'नाताळ' निमित्ताने मुंबई - पणजी मार्गावर 'शिवशाही' सेवा

नाताळ सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई -गोवा महामार्गावर 'शिवशाही' बस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बस नव वर्षानिमित्ताने सुरु ठेवण्यात येण्याची शक्यताही आहे.

Updated: Dec 22, 2017, 05:29 PM IST
'नाताळ' निमित्ताने मुंबई - पणजी मार्गावर  'शिवशाही' सेवा title=

मुंबई : नाताळ सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई -गोवा महामार्गावर 'शिवशाही' बस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बस नव वर्षानिमित्ताने सुरु ठेवण्यात येण्याची शक्यताही आहे.

 ' शिवशाही ' सेवा आजपासून सुरु

 नाताळ  सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर प्रवाशांना थेट गोव्याला जाण्यासाठी एसटी महामंडळाने मुंबई-पणजी या ,मार्गावर  ' शिवशाही ' ही बस सेवा आजपासून सुरु केलेय. सलग सुट्ट्याच्या काळात कोकण व गोव्याला पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना ही बस फायद्याची ठकरणार आहे.

कमी भाड्यात आरामदायी प्रवास

मुंबई - पणजीसाठी केवळ ९१३ रुपये तिकीट दर आकारण्यात आलाय. ही 'शिवशाही' बस अत्यंत आरामदायी वातानुकूलित आहे. ही 'शिवशाही' बस एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे.

असा असणार बसचा मार्ग

ही बस मुंबई सेंट्रल येथून रोज संध्याकाळी ५.०० वाजता सुटणार असून पनवेल, चिपळूण, लांजा, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी , बांदा, म्हापसा मार्गे पणजीला जाईल. तसेच पणजीहून दररोज संध्याकाळी ६ वाजता याच मार्गे परतीचा प्रवास करेल. या शिवशाही  बसचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळामार्फत करण्यात आले आहे.