"नारायण राणे सत्तापिपासू नेते, ईडीची कारवाई टाळण्यासाठी भाजप प्रवेश"

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Bjp Narayan Rane) यांनी केलेल्या आरोपांना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. 

Updated: Feb 16, 2022, 08:28 PM IST
"नारायण राणे सत्तापिपासू नेते, ईडीची कारवाई टाळण्यासाठी भाजप प्रवेश" title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Shivsena Mp Vinayk Raut) यांनी नारायण राणे (Bjp Narayan Rane) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर अनेक आरोप केले. या आरोपांना विनायक राऊतांनी जोरदार प्रत्त्युतर दिलं आहे. नारायण राणे हे सत्तापिपासून नेते आहेत. तसेच ते ईडीच्या कारवाईला घाबरुन भाजपात गेले, असं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले.  (shivsena mp vinayak raut critisized on bjp leader narayan rane)    

विनायक राऊत जे म्हणाले ते जसंच्या तसं

संजय राऊतांच्या पीसीतून सुटलेल्या बाणाने काहीजण घायाळ झालेत, काही विव्हळत आहेत. संजय राऊत हे सेनेचे नेते आहे. बाळासाहेबांनी त्यांना नेते केले होते, परंतु राणेंना नेता केलं नव्हते. यातून त्यांची लायकी कळते", अशा शब्दात विनायक राऊत यांनी राणेंवर हल्ला चढवला. 

"संजय राऊत निधड्या छातीचे सैनिक आहेत. राणेंच्या मागे ईडी लागल्यावर त्यांनी चोरवाटेने भाजपपुढं लोटांगण घातले", अशी टीका राऊतांनी केली.