अंगावर आले तर शिंगावर घेऊ - शिवसेना

शिवसेना (ShivSena) भवनासमोर आज शिवसेना आणि भाजप (BJP) कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर जोरदार राडा झाला. त्यानंतर आता शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. 

Updated: Jun 16, 2021, 05:44 PM IST
अंगावर आले तर शिंगावर घेऊ - शिवसेना title=

मुंबई : दादर येथील शिवसेना (ShivSena) भवनासमोर आज शिवसेना आणि भाजप (BJP) कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर जोरदार राडा झाला. त्यानंतर आता शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. उगाचच कळ काढली तर त्याला चोख उत्तर दिले जाईल. आमच्या अंगावर याल तर शिंगावर घेवू, असा रोखठोक इशारा महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी भाजपला दिला आहे.

अंगावर आले तर शिंगावर घेऊ - शिवसेना

शिवसेना ही चळवळीतून पुढे आली आहे. शिवसेना भवन हे आमचे श्रद्धास्थान आहे आणि याला कुणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर मग आमच्याकडून तसेच जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. ही केवळ एक रिअॅक्शन आहे. शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याची काय गरज आहे, असा सवाल त्यांनी भाजपला विचारला आहे. उगाचच कळ काढली तर त्याला चोख उत्तर दिले जाईल, हे लक्षात ठेवा. आमच्या अंगावर याल तर शिंगावर घेवू, अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला ठणकावले आहे.

का झाला राडा...

 

राम मंदिर उभारण्यासाठीच्या भूसंपादनाबाबत आरोपानंतर भाजपने आंदोलन छेडले. थेट शिवसेनेला डिवचण्यासाठी भाजपने शिवसेना भवनासमोर धडक देण्याचा प्रयत्न केला. यानंतर शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आलेत.

मुंबईत शिवसेना भवनासमोर भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादन बाबतीतील आरोपांबाबत भाजपने शिवसेना भवनासमोर आंदोलन केले, यावेळी भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. याचवेळी शिवसेने कार्यकर्तेदेखील शिवसेनाभवन बाहेर प्रत्युत्तर देण्यासाठी जमा झाले आणि गोंधळ निर्माण झाला. यावेळी भाजप आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच भाजप आंदोलक होते. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा राडा टळला.