मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक

मराठी पाट्यांच्या मुद्यावर आता शिवसेना आक्रमक झाली आहे. 

Updated: Jul 1, 2018, 10:40 PM IST
मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक title=

मुंबई : मराठी पाट्यांच्या मुद्यावर आता शिवसेना आक्रमक झाली आहे.  शिवसेनेने मिरा रोड येथील हाटकेश, जीसीसी क्लब शाखाप्रमुख महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलंय. परिसरातील दुकानांच्या इंग्रजीतील अक्षराना काळं फासतं घोषणाबाजी केली.  शिवसेना कार्यध्यक्ष उद्भव ठाकरे यांनी मराठी पाटयांबाबत ३० जुलै ही डेडलाइन दिली होती. स्थानिक शिवसैनिकांनी आठ दिवस अगोदर दुकानमालकांना मराठी पाटयां बाबत सूचनाही दिल्या होत्या  त्यामुळे  शिवसैनिकांनी हे आंदोलन छेडलं.

महत्त्वाची बैठक 

 विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सूरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहीले आहेत. यंदाच अधिवेशन हे नागपूरला घेण्यात येणार आहे. ४ जुलै पासून सूरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाला सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज झाले आहेत. शिवसेनेने देखील आपली रणनीती आखलीये. मातोश्रीवर महत्वपुर्ण बैठक पार पडली. या बैठकीला परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांच्यासह काही आमदार उपस्थित होते. बैठकी दरम्यान  महाराष्ट्रातील प्रश्नांवर चर्चा झाली. नाणार प्रकल्पावरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.