Bank Job: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, मुंबईत नोकरी आणि 78 हजारपर्यंत पगार

SBI Recruitment: स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये ‘फॅकल्टी (कार्यकारी शिक्षण), क्रेडिट आर्थिक विश्लेषक’ही पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरल्या जातील. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 9, 2023, 03:35 PM IST
Bank Job: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, मुंबईत नोकरी आणि 78 हजारपर्यंत पगार title=

SBI Recruitment: बॅंकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये ‘फॅकल्टी (कार्यकारी शिक्षण), क्रेडिट आर्थिक विश्लेषक’ही पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरल्या जातील. 

फॅकल्टी (कार्यकारी शिक्षण) चे 1 पद भरले जाणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. एमबीएसोबत शिकविण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवाराला 55 टक्क्यांपेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 28 ते 55 वर्षांदरम्यान असावे. फॅकल्टी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक 40 लाखांपर्यंत पगार दिला जाणार आहे. 

भारतीय टपाल खात्यात दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, 'ही' घ्या अर्जाची लिंक

क्रेडिट आर्थिक विश्लेषकची 3 पदे भरली जाणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून चार्टर्ड अकाउंटंट (CA)/ एमबीए (वित्त) किंवा समतुल्य /PGDM (वित्त) किंवा समतुल्य शिक्षण पूर्ण केलेले असावे.  यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 28 ते 55 वर्षांदरम्यान असावे. क्रेडिट आर्थिक विश्लेषक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 63 हजार ते 78 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. 

TMC Job: ठाणे पालिकेत पुन्हा भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल 'इतक्या' पगाराची नोकरी

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेत ही भरती केली जाणार आहे. यासाठी 29 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. दिलेल्या मुदतीनंतर आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्या. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मध्य रेल्वेत नोकरीची संधी 

मध्य रेल्वेच्या भरतीअंतर्गत एकूण 1303 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याअंतर्गत  असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजरची रिक्त पदे भरली जातील. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या पदभरतीसाठी 3 ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 2 सप्टेंबरपर्यंत अर्ज पाठविता येणार आहे. संगणक आधारित चाचणी (CBT), अभियोग्यता चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी याआधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी 41 वर्षे, ओबीसीसाठी 46 वर्षे, एससी/एसटी उमेदवारांसाठी 47 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. 3 ऑगस्टपासून ही अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 2 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्या.