संजय राऊत यांचा ट्विट करत नवनीत राणांवर निशाणा, 'भाजपकडून महाराष्ट्राची बदनामी'

Sanjay Raut On Navneet Rana and BJP :भाजप नेत्यांकडून महाराष्ट्राच्या बदनामीचं षडयंत्र सुरु आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी केली आहे. नवनीत राण यांचे सर्टिफिकेट बोगस असल्याचे ट्विट केले आहे. निवडणुकीवेळी राणा यांनी दिलेले सर्टिफिकेट ट्विट केले आहे.

Updated: Apr 25, 2022, 02:46 PM IST
संजय राऊत यांचा ट्विट करत नवनीत राणांवर निशाणा, 'भाजपकडून महाराष्ट्राची बदनामी' title=

मुंबई : Sanjay Raut On Navneet Rana and BJP :भाजप नेत्यांकडून महाराष्ट्राच्या बदनामीचं षडयंत्र सुरु आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी केली आहे. सोमय्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांची भेट का घेतली नाही, असाही सवाल त्यांनी केला आहे. राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर उत्तर प्रदेशात लावा, असा टोला त्यांनी लगावला. त्याचवेळी त्यांनी ट्विटवरुन नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. नवनीत राण यांचे सर्टिफिकेट बोगस असल्याचे ट्विट केले आहे. निवडणुकीवेळी राणा यांनी दिलेले सर्टिफिकेट ट्विट केले आहे.

भाजपकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात येत आहे. काय चालू आहे महाराष्ट्रात? दिल्लीत जाण्याएवढे काय झाले आहे महाराष्ट्रात? असा सवाल राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला आहे.  महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत भाजप नेते दिल्लीला गृहसचिवांची भेट घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी थेट भाजपलाच सवाल केला आहे. 

भाजपकडून हल्ल्याचा आरोप करण्यात येत आहे.  मोहित कंबोज यांच्यावरील हल्ला, राणा दाम्पत्यांवर दाखल केलेला राजद्रोहाचा गुन्हा, किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला या सर्व घटना पाहता कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे,  असा आरोप करत भाजपचे शिष्टमंडळ दिल्ली येथे गृसचिवांची भेट घेण्यासाठी गेले. त्याचाही समाचार राऊत यांनी घेतला. 

 राऊत म्हणाले, आयएनएस विक्रांत युद्धनौका घोट्याळ्यातील आरोपी किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्यास भेटायला गेले, तेव्हा संतप्त लोकांनी त्यांच्यावर चपला आणि दगड फेकले. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, असे भाजपवाले म्हणत असतील तर ते एकप्रकारे चोर, लफंग्यांचे समर्थन करीत आहेत. आयएनएस विक्रांत प्रकरणी पैशांचा अपहार करणाऱ्या आरोपीला केंद्राने विशेष सुरक्षा कवच दिले आहे. बनावट जात प्रमाणपत्राद्वारे लोकसभेत गेलेल्या नवनीत राणा कौर राणांसाठीदेखील केंद्राने अलगत सुरक्षा कवच दिले आहे. ठाकरे सरकारविरुद्ध बेताल बोला आणि केंद्राची सुरक्षा मिळवा, अशी ऑफर बाजारात आलेली दिसते.