Sanjay Raut : शिंदे गटाचे खासदार पळकुटे, अमित शाह काय मध्यस्ती करणार, हे स्पष्ट करावं - राऊत

Sanjay Raut : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा वादावरुन ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार पळकुटे असल्याचे म्हटले आहे. (Maharashtra Political News) 

Updated: Dec 10, 2022, 11:05 AM IST
Sanjay Raut : शिंदे गटाचे खासदार पळकुटे, अमित शाह काय मध्यस्ती करणार, हे स्पष्ट करावं - राऊत title=
Sanjay Raut on BJP

Sanjay Raut On Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा वादावरुन ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल चढविण्यात आला आहे. शिवसेनेचे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार पळकुटे असल्याचे म्हटले आहे. (Maharashtra Political News) ते महाराष्ट्राचा अपमान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाबाबत काहीच बोलत नाहीत. कर्नाटक सरकारकडून मराठी बांधवांची गळचेपी होत आहे. हल्ले चढवले जात आहेत. मात्र, शिंदे गटाचे पळपुटे खासदार संसदेत गप्प का?, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

शिंदे गटाचे पळपुटे खासदार संसदेत गप्प का?

कर्नाटक - महाराष्ट्र  सीमावादावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे मौन का, असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. 'कालही महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. मात्र, शिंदे गटाचे पळपुटे खासदार संसदेत गप्प का?, मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घ्यावी अशी अपेक्षा, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

मध्यस्ती करणार म्हणजे नक्की काय करणार?

संजय राऊत म्हणाले, पळकुटे खासदार गप्प राहिलेत, अमित शाह काय मध्यस्ती करणार?, हे त्यांनी स्पष्ट सांगावं. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली असे सांगितले जात आहे. मात्र, त्यांनी काय भूमिका घेतली आणि ते शाह काय मध्यस्ती करणार आहेत, ते त्यांनी सांगितले पाहिजे. मध्यस्ती करणार म्हणजे नक्की काय करणार, असे काही सांगितलेले नाही, असे राऊत म्हणाले.

चंद्रकांत पाटील अकलेचे कांदे - राऊत

यावेळी संजय राऊत यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. भाजपकडून राष्ट्रपुरुषांचा अपमान करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान राज्यपाल सारख्या पदावरील व्यक्तीकडून करण्यात येत आहे. तरीही भाजप गप्प आहे. महाराष्ट्र विरोधी ते आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, असा टोला राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. ते अकलेचे कांदे आहेत, असे ते म्हणाले.