मोर्चेकरी संतप्त... छत्रपती संभाजीराजे, नितेश राणेंना स्टेजवरच रोखलं!

मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून ठोस आश्वासन न मिळाल्यानं मराठा मोर्चेकरी संतप्त झालेत. 

Updated: Aug 9, 2017, 05:10 PM IST
मोर्चेकरी संतप्त... छत्रपती संभाजीराजे, नितेश राणेंना स्टेजवरच रोखलं! title=

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून ठोस आश्वासन न मिळाल्यानं मराठा मोर्चेकरी संतप्त झालेत. 

आझाद मैदानात जमलेल्या लाखो मोर्चेकऱ्यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांना घेराव घातला.

मोर्चेकऱ्यांनी त्यांना व्यासपीठावरच रोखून धरलंय. आरक्षणाचं काय झालं? कर्जमाफीचं काय? अशा सवालांची सरबत्ती मोर्चेकरी त्यांच्यावर केला. जवळपास अर्धा तास ही परिस्थिती कायम होती. 

पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर नेत्यांची यातून सुटका झाली. यामुळं आझाद मैदानात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.