Saif Ali Khan Attack News in Marathi: Saif Ali Khan च्या वांद्रा येथील राहत्या करी चोर शिरला होता. या चोराने सैफ अली खानवर 6 वार केले आहेत. यामधील 2 वार गंभीर असून त्याला लीलावती रुग्णालयात दाखल केले आहेत. रात्री 2.30 च्या सुमारास हा हल्ला घडला असून 3.30 च्या सुमारास त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. करीना कपूर आणि दोन मुलांसोबत सैफ वांद्राच्या या घरात राहतो. हा हल्ला झालं तेव्हा घरी कोण कोण होतं?
जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा करीना कपूर घरी नसल्याच म्हटलं जातं आहे. करीना कपूरने शेअर केलेल्या एका स्टोरीनुसार ती तिच्या बहिणींसोबत पार्टी करत असल्याच दिसत आहे. करीना कपूरचा हा फोटो करिश्मा कपूरची स्टोरी री-शेअर केली आहे. जेथे करीनासोबत सोनम कपूर, रिया कपूर आणि करिश्मा कपूर देखील होती. गर्ल्स नाइट अशी या स्टोरीची पोस्ट आहे.
ज्यावेळी चोराने हा हल्ला केला तेव्हा दोन्ही मुलं वांद्राच्या घरीच होती. नेमकं काय प्रकार घडला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. पण सैफ अली खानच्या घरातील मदतनीससोबत चोराचा वाद झाला. या प्रकाराने सैफ अली खानला जाग आली. चोर चोरी करायला घरात शिरला असताना सैफने बचाव केला. या दरम्यान चोराने त्याच्यावर 6 वार केले.
जेव्हा सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा त्याचे दोन्ही मुलगे त्याच्यासोबत घरी उपस्थित होते. खरंतर सैफ अली खानला चार मुले आहेत. पण इब्राहिम अली खान आणि सारा अली खान दुसऱ्या घरात राहतात. त्याच वेळी, त्याच्यासोबत त्याचा 8 वर्षांचा मुलगा तैमूर आणि जेह देखील होते. धाकटा मुलगा 3 वर्षांचा आहे. कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अद्याप हल्ल्याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. किंवा आतापर्यंत कोणीही त्याच्या घरी येताना दिसले नाही.